गणित चुकल्याने विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबली!

शिक्षकाच्या या अमानूष शिक्षेमुळे रोहनच्या तोंडातील अवयवांना जखमा झाल्या असून, रोहनला श्वसनास त्रास सरु झाला आहे.

By: | Last Updated: 14 Apr 2018 03:58 PM
गणित चुकल्याने विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबली!

अहमदनगर : अहमदनगरला गणित चुकल्यानं 8 वर्षीय विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबून शिक्षकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रोहन जंजीरे असे विद्यार्थ्याचे नाव असून, तो दुसरी इयत्तेत शिकतो आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली. चंद्रकांत शिंदे असे या मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.

पिंपळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतली घटना, दहा तारखेला सकाळी अकरा वाजता दुसरीतल्या रोहन जंजीरे या आठ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण, चंद्रकांत शिंदे नावाच्या शिक्षकानं केली मारहाण,

शिक्षकाच्या या अमानूष शिक्षेमुळे रोहनच्या तोंडातील अवयवांना जखमा झाल्या असून, रोहनला श्वसनास त्रास सरु झाला आहे. रोहनला पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी रोहनच्या आईने कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा म्हणून नोंदवून घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: student beaten by teacher in ahmednagar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV