ऊसतोड कामगाराच्या तीन महिन्याच्या मुलीचा थंडीने मृत्यू

लातूर जिल्ह्यात ऊसतोड कामगाराच्या तीन महिन्याच्या मुलाचा थंडीने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ऊसतोड कामगाराच्या तीन महिन्याच्या मुलीचा थंडीने मृत्यू

लातूर : राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि याच थंडीने एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला आहे. लातूर जिल्ह्यात ऊसतोड कामगाराच्या तीन महिन्याच्या मुलाचा थंडीने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

लातूर जिल्ह्यातील खलग्री शिवारात सध्या ऊसतोडणी सुरु आहे. या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील आमटी या गावातील ऊसतोड कामगार आले आहेत. ज्या ठिकाणी ऊसतोडणी सुरु आहे त्याच्या बाजूलाच राहण्यासाठी कापडी आसरा केला आहे. या झोपडीवजा आसऱ्यात राहिल्यामुळे ही घटना घडली.

ऊसतोड कामगार बाळू नामनौर आणि त्यांची पत्नी ऊसतोडणीसाठी लातूर जिल्ह्यात आले आहेत. उपजिविका भागवण्यासाठी ऊसतोडणीला आलेल्या या दाम्पत्याला आपली तीन महिन्यांची चिमुकली गमवावी लागली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: sugar cane c
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV