सुरेश धस यांनी पंकजांकडून 15 कोटी घेतले : धनंजय मुंडे

पैसे घेऊन मदत केल्याचा आरोप केल्याने आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावर काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागलं आहे.

सुरेश धस यांनी पंकजांकडून 15 कोटी घेतले : धनंजय मुंडे

बीड : राष्ट्रवादीशी बंडखोरी करून भाजपाशी घरोबा केलेल्या सुरेश धस यांनी आपल्याकडील 5 जिल्हा परिषद सदस्य भाजपाला देण्यासाठी तब्बल 15 कोटी रुपये घतले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.

सुरेश धस यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब आजबे यांनी आज भाजपातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर आरोप केला.

धनंजय मुंडे यांच्यामुळेच आपण राष्ट्रवादी सोडत असल्याचा आरोप यापूर्वी सुरेश धस यांनी केला होता. मात्र पैसे घेऊन मदत केल्याचा आरोप केल्याने आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावर काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागलं आहे.

धनंजय मुंडेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार : सुरेश धस

दुसरीकडे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे आरोप फेटाळले आहेत. प्रत्येक प्रकरणात तोडपाणी करणाऱ्या धनंजय मुंडेंना स्वतःला काविळ झाल्यामुळे सर्व जगच पिवळं दिसतच आहे, असंही सुरेश धस म्हणाले. धनंजय मुंडेंनी आपल्यावर खोटा आरोप केल्यामुळे त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: suresh dhas got 15 crore from pankaja to help bjp alleges dhananjay munde
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV