रावतेंविरोधात फेसबुक पोस्ट लिहिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचं निलंबन मागे

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर डेपोत वर्कशॉप मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या शरद जंगम यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

रावतेंविरोधात फेसबुक पोस्ट लिहिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचं निलंबन मागे

सांगली : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट लिहिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. रावतेंविरोधात फेसबुक पोस्ट लिहिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर डेपोत वर्कशॉप मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या शरद जंगम यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

विभागीय नियंत्रकांनी केलेल्या या निलंबनाच्या कारवाईवर चौफेर टीका होत होती. अखेर निलंबनाचा हा निर्णय मागे घेण्यात आला. हे महामंडळ चालवता येत नसेल तर चालते व्हा, अशा आशयाचा मजकूर शरद जंगम यांनी फेसबुकवर लिहिला होता.

एबीपी माझाने याबाबत सर्वात अगोदर बातमी दाखवली होती. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या बातमीची दखल घेत तातडीने निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले. सांगली विभाग नियंत्रक शैलेंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.

काय आहे फेसबुक पोस्ट?

मी शरद जंगम
इस्लामपूर आगार
महामंडळाचे अध्यक्ष श्री रावते
यांना खुले आव्हान देतो की एकदा कामगारांच्या समोर या आणि
आपली भूमिका स्पष्ट करा...
हे महामंडळ जर नीट चालवता येत नसेल आणि
कामगारांना त्यांच्या हक्काची वेतनवाढ देता येत नसेल
तर..
 चालते व्हा...
कामगार शक्तीचा अंत बघू नका..
आणखी एक गोष्ट आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरणारे
नाही.. लिहिला की फेकला

संबंधित बातमी :

रावतेंविरोधात फेसबुक पोस्ट, एसटी कर्मचाऱ्याचं निलं

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Suspension order canceled who wrote Facebook post against Diwakar raote
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV