कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणी निकाल सुनावणाऱ्या न्यायाधीश कोण?

अहमदनगरला जिल्हा सत्र न्यायाधीश असताना सुवर्णा केवले यांनी दोन निकालात सहा जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणी निकाल सुनावणाऱ्या न्यायाधीश कोण?

अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी शिक्षा सुनावली. केवले यांनी यापूर्वी लोणी मावळा अत्याचार आणि हत्याच्या खटल्यात तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी नागपूरला सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. यापूर्वी मुंबई शहर आणि दिवाणी न्यायालयात त्या न्यायधीश होत्या.

वेदना हीच शक्ती समजा आणि लढा: दिल्लीच्या निर्भयाच्या आईचा सल्ला 


अहमदनगरला जिल्हा सत्र न्यायाधीश असताना त्यांनी दोन निकालात सहा जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दोन्ही निकालात अनेक साम्यं आहेत. दोन्ही खटल्यात अल्पवयीन मुलीवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचा आरोप होता. दोन्ही खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि न्यायाधीश सुवर्णा केवले होत्या.

कोपर्डीचा निकाल : अॅड. उज्ज्वल निकमांनी काय माहिती दिली? 


केवले यांनी कोपर्डी खटल्यापूर्वी लोणी मावळा अत्याचार आणि हत्याच्या खटल्यात तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या निकालानंतर काही दिवसात त्यांनी कोपर्डीत तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. लोणी मावळात तीन आरोपींनी पीडितेवर अत्याचार करुन हत्या केली होती. पीडितेच्या नाका-तोंडात माती घातली होती. स्क्रू ड्रायव्हरनं शरीरावर जखमा केल्या होत्या.

फाशीची शिक्षा सुनावताच निर्भयाच्या आईने हंबरडा फोडला!


लोणी मावळा खटल्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर निकम यांनी तिघांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी सुद्धा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला होता. या खटल्यात न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी फाशीची शिक्षा सुनावली.

कोपर्डीचा युक्तीवाद जसाच्या तसा : अॅड. उज्ज्वल निकम विरुद्ध तीन वकील 


त्या निकालानंतर केवलेंनी कोपर्डीत आज तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्यातही प्रत्यक्षदर्शी कोणताच पुरावा नव्हता. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर निकम यांनी तिघांनी कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्यानं फाशीची शिक्षा मागणी केली होती. त्यानंतर न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी फाशीची शिक्षा सुनावली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Suvarna Kevale – The Judge who gave sentenced death penalty in Kopardi rape and murder case latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV