सदाभाऊंच्या ताफ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दगडफेक

सदाभाऊ कुर्डुवाडीतील कार्यक्रमाला जात असताना, काही शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले.

सदाभाऊंच्या ताफ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दगडफेक

पंढरपूर : स्वाभिमानीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. सदाभाऊ कुर्डुवाडीतील कार्यक्रमाला जात असताना, काही शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले.

काही दिवसांपूर्वी गारपीटग्रस्त जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी देखील सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा लागला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना काळे झेंडे दाखवत, तीव्र विरोध केला होता. त्या धास्तीने सदाभाऊंना आपला गारपीटग्रस्त भागाचा दौरा अर्धवट सोडावा लागला होता.

आजही अशाच प्रकारे पंढरपूर दौऱ्यावेळी सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्य कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला. कुर्डुवाडीमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच, त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाडीसमोर गाजरं फेकली.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या दगडफेकीत सदाभाऊंच्या ताफ्यातील एका गाडीचं नुकसान झालं आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, संघटक महावीर सावळे, सिध्देश्वर घुगे, बापू गायकवाड, सत्यवान गायकवाड यांना ताब्यात घेतलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: swabhimani shetkaris sanghtnas karykartas stone pleating on sadabhu kohts official cushion
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV