अश्लील मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांनीच काळं फासलं

बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी एका शिक्षकाला विद्यार्थ्यांनीच काळं फासल्याची घटना औरंगाबादमधील सरस्वती भुवन महाविद्यालयात घडली आहे.

अश्लील मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांनीच काळं फासलं

औरंगाबाद : बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी एका शिक्षकाला विद्यार्थ्यांनीच काळं फासल्याची घटना औरंगाबादमधील सरस्वती भुवन महाविद्यालयात घडली आहे.

शिक्षक मनोज जैस्वाल हा एका विद्यार्थीनीला वारंवार अश्लील मेसेज पाठवत होता. त्यासोबत तो तिला नेहमी ब्लॅकमेलही करत होता. या सर्व प्रकारने त्रस्त झालेल्या त्या विद्यार्थीनीने संपूर्ण  प्रकार प्रकार आपल्या भावाच्या कानावर घातला. त्यानंतर विद्यार्थिनीच्या भावाने महाविद्यालयातीलच विद्यार्थ्यांच्या सोबतीने मनोज जैस्वाल याला काळं फासलं.

या घटनेनंतर सरस्वती भुवन संस्थेच्या परिसरात खळबळ उडाली आहे. अत्यंत शिस्तप्रिय, संस्कारशील संस्था म्हणून सरस्वती भुवन संस्थेचा लौकिक आहे. त्यामुळे आता या शिक्षकावर संस्था काही कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: teacher harassing girl student in Aurangabad latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV