पूर परिस्थितीचा फायदा घेत आरोपीचं बेड्यांसह पलायन

पूर परिस्थितीचा फायदा घेऊन बलात्कारातील एका आरोपीनं पलायन केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.

पूर परिस्थितीचा फायदा घेत आरोपीचं बेड्यांसह पलायन

अहमदनगर : अहमदनगरमधील पूर परिस्थितीचा फायदा घेऊन एका आरोपीनं पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लघुशंकेच्या बहाण्यानं गाडीतून खाली उतरत आरोपी भैय्या उर्फ मोईन गुलाब शेख हा हातातील बेड्यांसह काल (बुधवारी) रात्री आठ वाजेच्या सुमारास फरार झाला.

मोईन शेख हा पाथर्डीतल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी आहे. त्याला सुनावणीसाठी पाथर्डीवरुन अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं. सुनावणीनंतर परतत असताना मेहकरीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

मेहकरीला पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. त्यामुळे इथं  वाहतूक ठप्प झाली होती. याच संधीचा फायदा घेऊन मोईननं लघुशंकेचा बहाणा केला आणि खाली उतरल्यावर पोलिसांना झटका देऊन बेड्यांसह पलायन केलं.

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या मोईन शेखचा कसून तपास सुरु आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV