बिल द्यायला पैसे नाही, रुग्णालयाचा बाळ देण्यास नकार

प्रसुतीनंतर दाम्पत्याने जवळ होते तेवढे पैसे रुग्णालयात जमा केले. मात्र सुट्टी घ्यायची तेव्हा पैसे नसल्याने रुग्णालयाने बाळ देण्यास नकार दिल्याचा आरोप दाम्पत्याने केला आहे.

The hospital refused to give the baby because couple don’t have money

वर्धा : मातृत्त्वाचा सन्मान करण्यासाठी सरकारकडून नेहमीच वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. मात्र या योजनांचा लाभ खरंच गरजूंना मिळतो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बिल भरायला पैसे नसल्याने रुग्णालयाने बाळ देण्यास नकार दिल्याचा आरोप एका दाम्पत्याने केला आहे.

मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील रोजमजुरी काम करणारं सिरसाम दाम्पत्य कामाच्या शोधात सध्या सेलू तालुक्यातील महाबळ येथे शेतात सालगडी म्हणून वास्तव्याला आहे. रेखा-सुखनंदन सिरसाम असं पती-पत्नीचं नाव आहे.

”पैसे नसल्यामुळे जेवणाचा डबा बंद”

रेखा यांना प्रसुतीसाठी 7 ऑगस्टला सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आलं. 8 ऑगस्टला त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र मुलाचं वजन कमी असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मागणीनुसार वेळोवेळी असे सहा हजार रुग्णालयात भरल्याचं सिरसाम दाम्पत्याकडून सांगण्यात आलं. मात्र आता बिलाची रक्कम न भरल्याने जेवणाचा डबा बंद केल्याचा आरोप रेखा यांनी केला आहे.

मुलाला दिवसभरात पाच ते सहा वेळा स्तनपान करणं गरजेचं आहे. त्यासाठी रेखा यांना पोषक आहार पुरवणं रुग्णालयाची कर्तव्य आहे. मात्र तसं न करता रुग्णालयाने पैसे नसल्यामुळे मिळणारं जेवणही बंद केल्याचा आरोप रेखा यांनी केला. रेखा यांना वर्ध्याच्या पवनसुत हनुमान सेवा ट्रस्टच्या मंडळींनी विचारपूस करत प्राथमिक गरजेपोटी मदत दिली आहे.

जवळ होते तेवढे पैसे जमा केले. मात्र आता उपचार सुरु असल्याने सतत पैसे मागितले जात आहेत. त्यामळे बाळाला रुग्णालयात सोडून पैसे मागण्यासाठी रेखा थेट महाबळा येथे पतीजवळ शेतात निघून आल्या. जवळ पैसे नसल्याने सिरसाम दाम्पत्याने रुग्णालयातून सुट्टी मागितली. मात्र पैसे द्या आणि बाळ घेऊन जा, असं रुग्णालयाने सांगितल्याचा आरोप सिरसाम दाम्पत्याने केला आहे.

कुठे आहेत सरकारी योजना?

सिरसाम दाम्पत्य बीपीएलधारक आहे. बीपीएलधारक असल्याने रेखा यांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळणं अपेक्षित होतं. रुग्णालयाने पैशांसाठी मातेची अडवणूक करणं बेकायदेशीर आहे. सिरसाम दाम्पत्याने भरलेले पैसे त्यांना परत मिळतील. रुग्णालयावर चौकशी करुन कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलं.

रुग्णालयाने आरोप फेटाळले

दरम्यान सेवाग्राम रुग्णालयाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. बाळ जन्मलं तेव्हापासूनच ते अशक्त आहे. वजन कमी असल्याने बाळावर उपचार सुरु आहेत. या रुग्णालयात पैशांअभावी सेवा बंद केली जात नाही, असा दावा सेवाग्राम रुग्णालयाने केला आहे.

सिरसाम दाम्पत्य परप्रांतीय असून महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांची पैशांअभावी अडवणूक होणं ही दुर्दैवी बाब आहे. मातृत्त्व सन्मानासाठी सरकारने कितीही योजना आणल्या, पण त्या गरजूंपर्यंत पोहोचतच नसतील, तर या योजना केवळ कागदोपत्रीच असल्याचं म्हणावं लागेल.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:The hospital refused to give the baby because couple don’t have money
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/09/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/09/2017   1. सत्तेतून बाहेर पडण्याचा

साईनगरी 40 मिनिटांवर, मुंबई-शिर्डी विमानाची यशस्वी चाचणी
साईनगरी 40 मिनिटांवर, मुंबई-शिर्डी विमानाची यशस्वी चाचणी

मुंबई/शिर्डी : आता देशभरातल्या भाविकांना साईबाबांचं दर्शन

औरंगाबादमध्ये बिर्याणीत कुत्र्याचं मांस?
औरंगाबादमध्ये बिर्याणीत कुत्र्याचं मांस?

औरंगाबाद : रस्त्यावर स्वस्तात बिर्याणी खात असाल तर सावधान! कारण

तुळजापुरात रेल्वे पोलिसाला महसूल कर्मचाऱ्याची मारहाण
तुळजापुरात रेल्वे पोलिसाला महसूल कर्मचाऱ्याची मारहाण

उस्मानाबाद : तुळजापुरातील पोलिस आणि महसूल प्रशासनातील वाद आता

शेतकऱ्याच्या पोराची कमाल, जगातील आठवं सर्वोच्च शिखर सर
शेतकऱ्याच्या पोराची कमाल, जगातील आठवं सर्वोच्च शिखर सर

सातारा : साताऱ्याचा गिर्यारोहक आशिष माने याने जगातील आठवं सर्वोच्च

नांदेड महापालिकेसाठी भाजप संपूर्ण ताकदीनिशी मैदानात!
नांदेड महापालिकेसाठी भाजप संपूर्ण ताकदीनिशी मैदानात!

नांदेड : नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप पहिल्यांदाच

अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे 100 मुलं दगावली?
अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे 100 मुलं दगावली?

उस्मानाबाद : अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे माध्यान्ह भोजन न

गडचिरोलीच्या जंगलात ‘टिंग टिंग गोटा’, दगडातून घंटानाद
गडचिरोलीच्या जंगलात ‘टिंग टिंग गोटा’, दगडातून घंटानाद

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एक अनोख्या प्रकारचा दगड आढळला आहे. या

भोंदूबाबांची यादी देणारे महंत मोहनदास बेपत्ता, अपहरणाची भीती
भोंदूबाबांची यादी देणारे महंत मोहनदास बेपत्ता, अपहरणाची भीती

नाशिक : राम रहीम, आसाराम बापू यांच्यासह अनेकांना भोंदू ठरवणारे अखिल

मुंबई-शिर्डी विमानाची चाचणी, राम शिंदेंसह पहिल्या विमानाचं उड्डाण
मुंबई-शिर्डी विमानाची चाचणी, राम शिंदेंसह पहिल्या विमानाचं उड्डाण

शिर्डी : मुंबई-शिर्डी विमानसेवेची पहिली उड्डाण चाचणी आज होणार आहे.