कुत्र्याला लघुशंका, मालकाला दोन हजार रुपयांचा दंड

दुसऱ्याच्या घरासमोर लघुशंका आणि विष्ठा करणाऱ्या कुत्र्याचा मालकाला जळगाव न्यायालयानं 2 हजारांचा दंड ठोठावला आहे.

कुत्र्याला लघुशंका, मालकाला दोन हजार रुपयांचा दंड

जळगाव : जर तुम्हाला कुत्रा पाळण्याचा छंद असेल, तर कान उघडे ठेवून ही बातमी ऐका. कारण दुसऱ्याच्या घरासमोर लघुशंका आणि विष्ठा करणाऱ्या कुत्र्याचा मालकाला जळगाव न्यायालयानं 2 हजारांचा दंड ठोठावला आहे.

जळगावच्या आदर्श नगरमध्ये राहणाऱ्या शर्मा परिवारानं मोठ्या आवडीनं कुत्रा पाळला. शर्मा त्यांच्या कुत्र्याला नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर सोडत असत. त्यांचा कुत्रा एका वृद्ध महिलेच्या घरासमोर लघुशंका आणि विष्ठा करायचा.

त्यामुळं त्या महिलेनं शर्मांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीशांनी शर्मा यांना चपराक लगावत, 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे कुत्र्याला नैसर्गिक विधीसाठी मोकळे सोडणाऱ्या कुत्रा मालकांचे चांगलेच धाबे आता दणाणले आहे . अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास पोलिंसानी सुद्धा कारवाईचा इशारा आता दिला आहे.

सार्वजनिक जागी कुत्र्याच्या नैसर्गिक विधीसाठी न्यायालयाने दंड केल्याची ही पहिलीच घटना असल्याने, संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हा चर्चेचा विषय आता बनला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV