धुळ्यातील साक्रीमध्ये प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, तिघेजण जखमी

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात आज (शुक्रवार) थोड्याच वेळापूर्वी प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं. या अपघातात पायलटलसह दोघेजण जखमी झाले आहेत.

धुळ्यातील साक्रीमध्ये प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, तिघेजण जखमी

धुळे : धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात आज (शुक्रवार) थोड्याच वेळापूर्वी प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं. या अपघातात पायलटलसह दोघेजण जखमी झाले आहेत.

साक्री तालुक्यातल्या शेवाळी फाट्याजवळच्या एका शेतामध्ये या विमानाचं क्रॅश लँडिंग झालं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं हे विमान कोसळलं.

Dhule plane crash 2

दरम्यान, विमानात बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकानं तात्काळ विमान नागरी वस्तीपासून दूर नेलं. वैमानिकानं वेळीच दाखवलेल्या या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टळली.

मात्र, हे विमान नेमकं कुठे चाललं होतं आणि यामध्ये कशामुळे बिघाड झाला होता. याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: The plane crash landing in Dhule three injured latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV