चोरलेल्या बाईक लपवण्यासाठी महापालिकेच्या मॅनहोलचा वापर

चोरलेली बाईक विक्री होण्यापूर्वी पोलिसांच्या नजरेपासून लांब ठेवण्यासाठी चक्क महापालिकेच्या मॅनहोल्स आणि सुकलेल्या गटाराचा वापर केला.

Thieves used Nagpur Municipal corporation’s manholes for bike latest updates

नागपूर : चोरलेले साहित्य कोणाच्या नजरेस येऊ नये, यासाठी चोर वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. मात्र नागपुरात तीन बाईक चोरांनी चोरलेल्या बाईक लपवण्यासाठी वापरलेली शक्कल सर्वाना थक्क करणारी आहे. चोरलेली बाईक विक्री होण्यापूर्वी पोलिसांच्या नजरेपासून लांब ठेवण्यासाठी चक्क महापालिकेच्या मॅनहोल्स आणि सीवर लाईनचा वापर केला.

नागपुरातील कैकाडे नगर भागातील हे मॅनहोल आहे. साधारणपणे महापालिकेच्या अशा मॅनहोल्समधून दुर्गंधीयुक्त कचरा बाहेर पडतो. मात्र इथे चोरी गेलेल्या बाईकचा खजिनाच सापडला आहे.

सोनेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत मनीषनगर, बेसा तसेच नागपूर शहरातील इतर भागातून गेल्या काही दिवसात अनेक बाईक चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांचे पथक बाईक चोरांच्या मागावर होतेच. परिसरातील नागरिकांकडून तीन संशयित युवकांबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. 14 जुलै रोजी प्रतीक गिरी, तेजलाल बिसेन आणि एक विधी संघर्ष बालक कैकाडे नगर भागात नव्या सावजच्या शोधात असताना पोलिसांच्या हातात लागले. त्यांच्याकडून चौकशी केली असता तिघांनी नागपुरात 8 बाईक चोरल्याची कबुली दिली.

बाईक चोरल्यानंतर हे चोरटे कधीच ती बाईक घटनास्थळी चालू करत नव्हते. तर ती बिघडली आहे किंवा पेट्रोल संपले आहे, असे सोंग धरत ती पायीच लांबपर्यंत न्यायचे आणि तिथे ती चालू करून पळ काढायचे. खरेदीदार मिळेपर्यंत ती बाईक लपवून ठेवायचे किंवा दुसऱ्या शहरात नेऊन नव्या चोऱ्यांसाठी ती बाईक वापरायचे अशी माहिती तिघांनी पोलिसांना दिली.

दरम्यान, चोरलेल्या बाईक कुठे लपवल्या याची माहिती पोलिसांनी विचारताच तिघांनी दिलेले उत्तर पोलिसांना ही थक्क करणारे होते. तिघांनी चोरीचे माल लपवण्यासाठी चक्क महापालिकेचे मॅनहोल आणि एक सुकलेली सीवर लाईनचा (गटार) वापर केला होता. तर काही बाईक्स जवळच एका झुडुपातही लपवल्या होत्या.

उन्हाळ्याच्या दिवसात महापालिकेचे मॅनहोल्स सुकलेले असतात. त्यांच्यामधून पाणी वाहत नाही. महापालिकेचे कर्मचारीही त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे चोरीचे साहित्य लपवण्यासाठी तेच सर्वात सुरक्षित स्थान मिळाल्याची माहिती चोरट्यांनी पोलिसांना दिली असली तरी त्यांचे महापालिकेबद्दलचे तर्क पालिकेच्या स्वच्छता विषयक कार्यपद्धतीची खिल्ली उडविणारे आहे.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Thieves used Nagpur Municipal corporation’s manholes for bike latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना महाराष्ट्रातील

छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड
छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड

मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे यांना

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017   मान्सून जुलैअखेर 10

मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात
मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

रायगड : हो असा… आपलो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17.. हयसर खड्डे शोधूक

मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार
मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार

मुंबई: सध्या सर्वदूर पाऊस कोसळत असला, तरी लवकरच तो ब्रेक घेण्याचा

राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे
राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे

मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी

कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका
कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका

कोल्हापूर: कोल्हापुरातल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 खासगी

बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुणे : बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका

'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया
'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया

सोलापूर:  काऊ बॉय ऑफ सोलापूर..अर्जुन कदम.. वय… फक्त 90.. कदमांच्या

कोविंद यांच्या विजयाने सेनेची हवा गुल, राज्यात भाजपकडे बहुमत?
कोविंद यांच्या विजयाने सेनेची हवा गुल, राज्यात भाजपकडे बहुमत?

मुंबई : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या