माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र

'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र' या चर्चासत्रात ई-मनी, ई-शिक्षण, ई-आरोग्य आणि सोशल मीडिया या विषयांवर संबंधित क्षेत्रातील दिग्गज आपलं मत मांडतील.

माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र

मुंबई : सध्याच्या काळात डिजिटल तंत्रज्ञान हे जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. डिजिटलायझेशनमुळे सामान्य व्यक्तींच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा धांडोळा घेण्यासाठी माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यंदा या कार्यक्रमाचं तिसरं वर्ष आहे.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावणार आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एबीपी माझाच्या 'ब्लॉग माझा स्पर्धा 2017' चा निकाल जाहीर करण्यात येईल. यावेळी विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक राजन खान आणि भारतीय तसेच पाश्चिमात्य संगीताचे अभ्यासक, स्तंभलेखक डॉ. आशुतोष जावडेकर लाभले. हे दोघ विजेत्यांच्या नावाची घोषणा करतील.

'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र' या चर्चासत्रात ई-मनी, ई-शिक्षण, ई-आरोग्य आणि सोशल मीडिया या विषयांवर संबंधित क्षेत्रातील दिग्गज आपलं मत मांडतील. महाराष्ट्राला डिजिटल तंत्रज्ञानाने सक्षम राज्य बनवण्यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत, त्याचा आढावा या कार्यक्रमात घेतला आहे.

ई-मनी
ई-मनी विषयावर प्रसाद आझगावकर (सीईओ, आयरिअॅलिटीज टेक्नॉलॉजी अँड एन्टरप्रायझेस), योगेश जोशी (वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम इन डावोस, स्वित्झर्लंड), गौतम शेलार (डिजिटल बिझनेस एक्स्पर्ट), मिलिंद वरेरकर (सारस्वत बँकेचे आयटी हेड) हे चर्चा करतील आणि त्यानंतर प्रश्नोत्तराचा काळ असेल. यानंतर  सारस्वत बँकेचे डिजिटल हेड कुणाल कारखानीस, भिम अॅपद्वारे ई-बँकिंगंच प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. तसंच अनिल जैन हे बिझनेस ऑन डिजिटल प्लॅटफॉर्म या विषयावर केस स्टडी सादर करतील.

ई-शिक्षण
ई-एज्युकेशनवर सचिन तोरणे (टाटा इंटरअॅक्टिव्हचे प्रमुख), डॉ. सायली गंकर (एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रमुख), गुरुप्रसाद रेगे (बालमोहन विद्यामंदिर शाळेचे संस्थापक), रणजीत दिसले (बालभारती बोर्ड) आपलं मत मांडली. त्यानंतर पनवेलकर ग्रुपतर्फे स्मार्ट सिटीज अँड लिव्हिंग या विषयावर केस स्टडी सादर होणार आहे.

सोशल मीडिया
या विषयावर निधी कामदार, (मुख्यमंत्री कार्यालयाच्या ओएसडी), पुरुषोत्तम पाटकर, (मानसोपचारतज्ज्ञ, सोशल मीडिया स्पेशालिस्ट), संदीप देशपांडे, (सोशल मीडिया एक्स्पर्ट), अभिषेक सुर्यवंशी (उपाध्यक्ष, विकीपीडिया), मेघराज पाटील, (www.abpmajha.in चे प्रमुख), प्रसाद आझगावकर (सीईओ, आयरिअॅलिटीज टेक्नॉलॉजी अँड एन्टरप्रायझेस) चर्चा करणार आहेत.

ई-हेल्थकेअर
तर ई-हेल्थकेअर हे या कार्यक्रमाचं शेवटचं सत्र असेल. डॉ. रोशन पालेवार (डॉक्रोश अॅपचे संस्थापक), प्रशांत नागरे (संचालक, फर्मेंटा बायोटेक लिमिटेडचे), डॉ. मुग्धा शान, (ऑक्युपेशनल थेरपिस्ट) आपल्या चर्चासत्रात ई-हेल्थकेअरचं महत्त्व सांगतील. यानंतर डॉ. रोशन पालेवार हेल्थकेअर अॅपच्या वापराबाबत लाईव्ह डेमो दाखवतील.

माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्रचे प्रमुख पाहुणे डॉ. दीपक सावंत समारोपाचं भाषण करतील.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Third season of Majha Maharashtra Digital Maharashtra
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV