औरंगाबादेत गॅस्ट्रोचं थैमान, तब्बल 2612 जणांना लागण

ड्रेनेजचं पाणी मिसळल्याने गॅस्ट्रोची साथ पसरल्याची शक्यता असल्याचं औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी म्हटलं आहे.

औरंगाबादेत गॅस्ट्रोचं थैमान, तब्बल 2612 जणांना लागण

औरंगाबाद : खराब पाण्यामुळे औरंगाबाद शहरात 2612 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ड्रेनेजचं पाणी मिसळल्याने गॅस्ट्रोची साथ पसरल्याची शक्यता असल्याचं औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी म्हटलं आहे.

ड्रेनेजचं पाणी कुणाच्या चुकीमुळे पसरलं, याची चौकशी करणार असल्याचं महापौर घोडेले यांनी सांगितलं. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेकांवर उपचार करुन सोडण्यात आलं आहे, तर हजारो रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

औरंगाबादमधल्या छावणी परिसरातून या रोगाची सुरुवात झाली. छावणीतील विविध भागांतील अनेक नागरिकांना मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता या त्रासाने संपूर्ण छावणी परिसराला वेढा घातला. लहान मुले, महिला-पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ अशा सर्वांना या आजाराने वेढले असल्यामुळे उपचारासाठी नागरिकांनी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: thousand of peoples infected with Gastro in Aurangabad
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV