एक्सप्रेस वेवर कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

खालापूरच्या फूड मॉलनजीक मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर कारचा अपघात झाला.

एक्सप्रेस वेवर कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूरनजीक एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांची नेमकी माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

खालापूरच्या फूड मॉलनजीक मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर कारचा अपघात झाला आहे. दुपारी 12च्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला.

दरम्यान, या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, आता ही कार बाजूला काढल्यानं वाहतूक सुरळीत झाली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Three dead in Express way car accident
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV