नागपूर आमदार निवासाचे नियम कडक, ‘माझा’च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

नागपूर आमदार निवासाचे नियम कडक, ‘माझा’च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

नागपूर: नागपूरच्या आमदार निवासात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त प्रसारित केल्यानंतर आता प्रशासनानं आमदार निवासासाठी नवे निमय तयार केले आहेत.

या नियमांशिवाय आरोपी मनोज भगतला रूम देणाऱ्या रामकृष्ण राऊत या कक्ष सेवकची तातडीनं बदलीही करण्यात आली आहे.आमदार निवासातील 320 या रुममध्ये एका अल्पवयीन मुलीवर चार दिवस सामूहिक बलात्कार झाला होता.

आमदार निवासासाठी तीन नवे नियम:

  1. रूम देताना ओळखपत्राची प्रत सक्तीने घेतली जाईल. (आधीही हा नियम होता. पण, संबंधित प्रकरणात ओळखपत्राची प्रत घेतली नव्हती.)


 

  1. शाखा अभियंता दररोज नोंदवहीमधील रूम आरक्षणाची नावे आणि तेच लोक प्रत्यक्ष रूममध्ये राहतात का? का याची पाहणी करेल.


 

  1. उपविभागीय अभियंता आता आठवडयातून दोनदा रूम आरक्षण नोंदवही आणि प्रत्यक्ष रूम पाहणी करेल.


 

काय आहे नेमकं प्रकरण?

मनोज भगतच्या दुकानात काम करणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर रजतची नजर होती. मनोज भगतनं पीडितेच्या घरी खोटं कारण सांगितलं. मुलीला कुटुंबासह भोपाळला घेऊन जातो अशी फूस लावली आणि आमदार निवास बूक केलं.

मनोज भगत यानं रजतसाठी सर्व व्यवस्था केली होती. पण एकट्या मुलीला पाहून मनोजची नियत फिरली आणि दोघांनी मिळून पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

14 एप्रिल ते 17 एप्रिल चार दिवस आमदार निवासात मुलीवर बलात्कार होत होता. या काळात मुलीची तब्येत बिघडली. तिला फिगो कार (एमएच 31 ईके 5408) ने हॉस्पिटलमध्ये नेऊन पुन्हा आमदार निवासात आणलं. पण इथल्या व्यवस्थापनाला त्याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

नागपूरमधील धक्कादायक प्रकारानंतर आमदारांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या:

नागपूरच्या आमदार निवासातील गँगरेपबाबत धक्कादायक माहिती

नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: aamdar niwas Nagpur Three new rule
First Published:

Related Stories

LiveTV