नाताळच्या सलग सुट्ट्यामुळे महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे आजही अनेक महामार्गांवर हळूहळू वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेण जवळ वाहनांची कोंडी झाली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

नाताळच्या सलग सुट्ट्यामुळे महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई : नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे आजही अनेक महामार्गांवर हळूहळू वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेण जवळ वाहनांची कोंडी झाली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दुसरीकडे मुंबई-पुणे महामार्गावरच्या खंडाळा घाटात वाहतूक मंदावली आहे, यावर उपाय म्हणून लोणावळ्याजवळ दर 1 तासाने वाहनं अडवली जाणार आहे. त्यानंतर ती पुढे टप्प्याटप्प्यानं सोडली जाणार आहेत. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

सोबतच विरारमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी सुरुच आहे. विरार हद्दीत खणीवडे टोल नाक्यावर गुजरातला जाणाऱ्या दिशेला  वाहनांच्या रागाचं रांगा लागल्या आहेत. वाहनांच्या 1 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.

वर्सोवा पुलाजवळही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या वाहनधारकांचे मात्र या कोंडीमुळे हाल सुरु आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: traffic jam on various roads due to long weekend latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV