मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर फक्त नावाला असलेलं ट्रॉमा केअर सेंटर

पुण्याहून मुंबईकडे जाताना टोलनाक्यापासून पुढे तीन किलोमीटवर ओझर्डे गावाजवळ हायवेच्या शेजारी वूड स्टॉक कंपनीचा फुडमॉल आहे. पण इथे ट्रॉमा सेंटरचं नामोनिशाणही नाही.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर फक्त नावाला असलेलं ट्रॉमा केअर सेंटर

एक्स्प्रेस हायवे : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे हा देशातला सर्वात बिझी हायवे म्हणून ओळखला जातो. हायवेवरील अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी म्हणून ट्रॉमा सेंटर उभं करण्याचा निर्णय झाला. हे सेंटर बांधून तयारही आहे. पण लालफिती कारभाराने त्याची काय दुर्दशा झाली, हे सांगणारा ‘माझा’चे प्रतिनिधी विलास बडे यांचा विशेष रिपोर्ट...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर तीन वर्षांपूर्वी ट्रॉमा केअर सेंटर बांधून झालं. ट्रॉमा सेंटरच्या रुम वूड स्टॉक कंपनीचे सिलेंडर आणि कोल्ड्रिंक्सने भरलेल्या आहेत. तर याच काही रुममध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपला संसार थाटला आहे. इथे ना डॉक्टर आहेत ना कसली आरोग्य सुविधा. फक्त नावालाच ट्रॉमा सेंटर आहे.

expressway 2

पुण्याहून मुंबईकडे जाताना टोलनाक्यापासून पुढे तीन किलोमीटवर ओझर्डे गावाजवळ हायवेच्या शेजारी वूड स्टॉक कंपनीचा फुडमॉल आहे. पण इथे ट्रॉमा सेंटरचं नामोनिशाणही नाही.

हायवेवर अपघात झाला की एकतर जखमीला पुण्याला किवा थेट नवी मुंबईला न्यावं लागतं. अपघातानंतरच्या गोल्डनअवरमध्ये उपचार न मिळाल्याने सर्वाधिक जखमी दगावतात.

हायवेवर ट्रॉमा सेंटर

मुबंई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर 15 वर्षात 14 हजार 500 अपघात झाले. त्यात 1450 लोकांचा जीव गेला. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी म्हणून ट्रॉमा सेंटर उभं राहिलं. वूड स्टॉक प्रा. लि. कंपनीने ते बांधून देण्याचा सरकारला प्रस्ताव दिला. 2014 मध्ये बांधून पूर्णही झालं.

expressway 1

ट्रॉमा सेंटर बांधून देण्याच्या बदल्यात सरकारने वू़ड स्टॉक हेलिकॉप्टर्स प्रा. लिमिटेड कंपनीला थेट एक्स्प्रेस हायवे वरून एन्ट्री दिली. जी सहजासहजी कोणाला मिळत नाही. त्यानंतर त्यांनी इथं भव्य फुडमॉल आणि फास्टफूड आऊटलेट्स, दोन हेलिपॅड, अनेक शॉप असं साम्राज्य उभं केलं. सरकारी जागेतच पार्किंगही थाटली. ज्या ट्रॉमा सेंट्रच्या नावावर हे सगळं साम्राज्य उभं राहिलं ते ट्रॉमा सेंटर मात्र लालफिती कारभारात अडकलंय आणि त्याचं असं गोडाऊन बनवलं आहे.

एमएसआरडीसीचं स्पष्टीकरण

एमएसआरडीसी ट्रॉमा सेंटर चालवू शकत नाही. याबद्दल आम्ही आरोग्य विभागाला कळवलं आहे. त्याचबरोबर ट्रस्ट आणि काही खासगी हॉस्पिटल्सकडून आम्हाला प्रस्ताव आले आहेत. लवकरच निविदा काढून हे ट्रॉमा सेंटर सुरु केलं जाईल. वूड स्टॉक कंपनीकडून त्याचा इतर कारणांसाठी वापर केला जात असेल तर चौकशी करून कारवाई करू, असं स्पष्टीकरण एमएसआरडीसीकडून देण्यात आलं.

खरी गंमत पुढेच आहे. 3 हजार स्क्वेअर फुटांच्या ट्रॉमा सेंटरच्या इमारतीसाठी अधिकारी, नेते वूड स्टॉक कंपनीवर मेहरबान झाले. पण एमएसआरडीसीची स्वत:ची हक्काची इमारत मात्र अशी बेवारस पडलेली आहे. लोणावळ्यातल्या अत्यंत मोक्याच्या जागेवर फूड मॉलसाठी भव्य इमारत उभी केली. पण तिची दुरावस्था झाली आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातामुळे शेकडो जणांना आपला जीव गमावावा लागला. मात्र सरकारने जातीने लक्ष घालून ट्रॉमा सेंटर सुरू केलं असतं तर कैक लोकांचे प्राण वाचवता आले असते. मात्र स्टॉक वुड्स कंपनीची नफेखोरी वृत्ती, प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा आणि आरोग्यविभागाचा निष्क्रियपणा पाहिल्यानंतर, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल उपस्थित होतो.

पाहा व्हिडिओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV