ट्रकची समोरासमोर धडक, ड्रायव्हर जागेवर जळाला!

ट्रकची समोरासमोर धडक, ड्रायव्हर जागेवर जळाला!

गोंदिया : देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मसूलकशा घाटाजवळ आज सकाळी झालेल्या ट्रकच्या अपघातात एक ट्रक चालकाचा जळून मृत्यू झाला, तर दुसऱ्या ट्रकमधील चालक आणि क्लीनरने अपघात होताच घटना स्थळावरून पळ काढला.

नागपूरहून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची आणि रायपूरवरुन नागपूरच्या दिशेने येणाऱ्या मिनी ट्रकची एकमेकांना धडक झाली. अपघात इतका भीषण होता की धडक होताच ट्रकला आग लागली. रायपूरच्या दिशेने येणाऱ्या मिनी ट्रकमध्ये विद्युत विभागाचे ट्रान्सफॉर्मर असल्याने ट्रकने अपघात होताच अचानक पेट घेतला.

ट्रकचालक हा ट्रकमध्ये एकटाच असल्याने आणि त्याचा पाय स्टेरिंगमध्ये अडकल्याने ट्रकमधून बाहेर पडता आले नसल्याने आग लागतचाच ट्रकचा चालक जिवंत जाळला, तर आग लागण्याने राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहातूक दोन तास थांबली. दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोकांना याचा त्रास सहन करावा लागला.

घटनास्थळापासून देवरी तालुका हा 5 किलो मीटर अंतरावर आहे. देवरी नगर पंचायत राष्ट्रीय महामार्गावर असून नगर पंचायतीकडे अग्निशमन दलाची गाडी नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अशी घटना घडल्यास गोंदियावरुन 70 किलोमीटरचा अंतर ओलांडून अग्निशमन दलाचे बंब बोलावून आग विझवावी लागते. नागरिकांनी देवरी नागरपंचायतीला अग्निशमन दलाची गाडी ठेवण्याची मागणी केली आहे.

जर आज देवरी नगरपंचायतीकडे अग्निशमन दलाचे बंब असते तर कदाचित ट्रकचालकाचा जीव वाचवता आला असता.

दरम्यान, ट्रक पूर्ण जळाल्याने ट्रकचालकाची ओळख पटू शकली नाही. उशिरा पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीने उर्वरित आग विझवली. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

First Published:

Related Stories

वाळूच्या ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, गावकऱ्यांनी ट्रक पेटवला
वाळूच्या ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, गावकऱ्यांनी ट्रक...

भंडारा : भरधाव वाळूच्या ट्रकनं दिलेल्या धडकेत एका शाळकरी

नागपूरमध्ये हायटेन्शन वायरच्या स्पर्शानं तीन बालकांचा मृत्यू, 6 संस्थांना नोटीस
नागपूरमध्ये हायटेन्शन वायरच्या स्पर्शानं तीन बालकांचा मृत्यू, 6...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठानं महावितरणसह 6

'एबीपी माझा'ला मान्यवरांच्या शुभेच्छा !
'एबीपी माझा'ला मान्यवरांच्या शुभेच्छा !

मुंबई: प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या तुमच्या लाडक्या

कल्याणच्या नेवाळी गावात तणाव, संरक्षण राज्यमंत्र्यांची बैठक
कल्याणच्या नेवाळी गावात तणाव, संरक्षण राज्यमंत्र्यांची बैठक

कल्याण : कल्याणमध्ये नेवाळी विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात

नागपूरमधील जुळ्या भावांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर अटकेत
नागपूरमधील जुळ्या भावांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर अटकेत

नागपूर : नागपूरमधील हायटेन्शन वायरच्या शॉकमुळे झालेल्या जुळ्या

पावसाने पाठ फिरवल्यानंतर भाज्यांच्या दरातही उसळी
पावसाने पाठ फिरवल्यानंतर भाज्यांच्या दरातही उसळी

नवी मुंबई : पावसाने राज्याकडे पाठ फिरवल्यानंतर आता भाजीपाल्याच्या

कल्याणमध्ये शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन, पोलिसांच्या गाड्या पेटवल्या
कल्याणमध्ये शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन, पोलिसांच्या गाड्या पेटवल्या

कल्याण : नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित

पालखी स्वागतावरुन पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
पालखी स्वागतावरुन पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

पुणे : पुण्यातील पालखी सोहळ्याच्या स्वागतावरुन महापालिकेतील

मान्सूनच्या पावसासाठी आणखी 24 तास प्रतीक्षा करावी लागणार
मान्सूनच्या पावसासाठी आणखी 24 तास प्रतीक्षा करावी लागणार

पुणे : राज्यात मान्सूनच्या दमदार हजेरीसाठी आणखी 24 तास वाट पाहावी

'एबीपी माझा'ची दशकपूर्ती, प्रेक्षकांच्या विश्वासपूर्तीचा 'माझा'ला अभिमान!
'एबीपी माझा'ची दशकपूर्ती, प्रेक्षकांच्या विश्वासपूर्तीचा 'माझा'ला...

मुंबई: दहा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी तुमच्या सर्वांच्याच साक्षीनं