कोयत्याने वार करुन मित्राची हत्या, दहावीतील दोन विद्यार्थ्यांना अटक

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील पिराळे गावात दहावीतील दोन विद्यार्थ्यांनी कोयत्यानं वार करुन आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कोयत्याने वार करुन मित्राची हत्या, दहावीतील दोन विद्यार्थ्यांना अटक

 

पंढरपूर : मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात घडली आहे. येथील पिराळे गावात दोन मित्रांनी कोयत्यानं वार करुन आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश कारंडे असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून हे सगळे समता माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.

विशेष म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी शाळा सुरु होती. मात्र, वर्गातल्या एका खोलीत घेरुन महेशवर कोयत्यानं वार करण्यात आले.

महेश हा समता विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. काल (मंगळवार) तो सराव परीक्षेसाठी शाळेत गेलेला असताना सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास त्याला कुणीतरी शाळेच्या स्टोअर रुममध्ये बोलावलं. त्यानंतर तिथेच कोयत्याने वार करुन त्याची हत्या करण्यात आली.

या घटनेनंतर त्याच्या वर्गातील दोघेजण परीक्षा न देता पळून गेले. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांचाही शोध घेत त्यांना तात्काळ अटक केली.

दरम्यान, या हत्येमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दिवसाढवळ्या शाळेतील विद्यार्थ्याची हत्या होत असताना ही गोष्ट कुणालाही कळाली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Two 10th standard students arrested in the murder case latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV