ऊसतोड मजुराच्या मुलांचा होरपळून मृत्यू, बीड जिल्ह्यातील घटना

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील बंजारा नगर भागातील ही घटना आहे.

ऊसतोड मजुराच्या मुलांचा होरपळून मृत्यू, बीड जिल्ह्यातील घटना

बीड : ऊसतोड कामगाराच्या दोन चिमुकल्या मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील बंजारा नगर भागातील ही घटना आहे.

शहरातील बंजारा नगर भागातील विजय जाधव हे ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोडणीसाठी ते पत्नीसह कर्नाटक राज्यात आहेत. त्यांची मुलं आज्जी-आजोबांकडे राहतात. चुलीवर ठेवलेलं पाणी अंगावर पडल्याने या चिमुकल्यांचा मृत्यू झाला.

वैष्णव (वय 6 वर्ष) आणि वैभव (वय 3 वर्ष) आजी आजोबा यांच्याकडे सांभाळ करण्यासाठी ठेवलेले होते. आंघोळीसाठी चुलीवर पाणी गरम करण्यास ठेवलं होतं. थंडीमुळे चुलीजवळ बसलेल्या या दोन मुलांच्या हे गरम पाणी अंगावर पडल्याने दोघांचाही होरपळून मृत्यू झाला.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: two childrens died by burn in hot water in Beed
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Beed majalgaon बीड माजलगाव
First Published:
LiveTV