रुग्णालयातून दोन दिवसांचं बाळ चोरणारा अटकेत

यवतमाळ जिल्ह्यातील वणी ग्रामीण रुग्णालयातून 6 नोव्हेंबर रोजी जन्मलेलं हे बाळ चोरीला गेलं.

रुग्णालयातून दोन दिवसांचं बाळ चोरणारा अटकेत

यवतमाळ : ग्रामीण रुग्णालयातून दोन दिवसांच्या बाळाचं अपहरण करणाऱ्यांच्या पोलिसांन मुसक्या आवळल्या आहेत. अवघ्या पाच तासांच्या यात या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आलं. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या बाळाची विक्री केल्याचा पोलिसांना अंदाज आहे.

अपहरणकर्त्याला पोलिसांनी आंध्र प्रदेशातील असिफाबाद येथून ताब्यात घेतलं. बाळ विक्रीचं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. मात्र यवतमाळमधून अपहरण करण्यात आलेल्या बाळाचा अजून शोध लागलेला नाही.

ग्रामीण रुग्णालयातून दोन दिवसांचं बाळ चोरीला गेल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी ग्रामीण रुग्णालयातून 6 नोव्हेंबर रोजी जन्मलेलं हे बाळ चोरीला गेलं.

नुसरत बानो असं मातेचं नाव असून तिने 6 नोव्हेंबर रोजी या रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला होता. पहाटे  4 ते 4.30 च्या दरम्यान हे बाळ चोरीला गेल्याचं बोललं जात आहे. दरम्यान रुग्णालयातील सीसीटीव्ही बंद आहेत. सुरक्षा रक्षकही जागेवर नसतात, अशी माहिती आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: two days old baby stolen from wani rural hospital
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: BABY wani yavatmal बाळ यवतमाळ वणी
First Published:
LiveTV