औरंगाबादमध्ये एमआयएमच्या दोन नगरसेवकांना अटक

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी केली अटक केली.

औरंगाबादमध्ये एमआयएमच्या दोन नगरसेवकांना अटक

औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी औरंगाबादमध्ये एमआयएमच्या दोन नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी केली अटक केली.

एमआयएमचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि सय्यद मतीन सय्यद रशीद यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं.

महापालिकेच्या 16 ऑक्टोबर 2017 रोजीच्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा चालू असताना बायजीपुरा वॉर्ड क्रमांक 60 चे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि टाऊन हॉल वॉर्ड क्रमांक 20 चे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद यांनी गोंधळ घातला होता.

महापौरांचा राजदंड सभागृहाबाहेर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा अधिकारी बापू जाधव यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी त्या दोघा नगरसेवकांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनी त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि खुर्ची फेकून मारली होती.

संबंधित बातमी :

औरंगाबाद मनपात एमआयएम नगरसेवकांची राडेबाजी

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: two MIM corporators arrested in Aurangabad
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV