भंडाऱ्यात दोन सख्या बहिणींचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या दोन सख्या बहिणींचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील मंडवी गावात घडली आहे.

भंडाऱ्यात दोन सख्या बहिणींचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

भंडारा : पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या दोन सख्या बहिणींचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी  मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील मंडवी गावात घडली आहे. तर एका तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

इशिका आणि निशिका घोनमाळे अशी मृत बहिणींची नावं आहेत तर सविता सार्वे ही तरुणी या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. इशिका, निशिका आणि सविता यांचं पोलीस दलात जाण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी या तिघी दररोज पहाटे धावणायचा सराव करायच्या.

आज (गुरुवार) पहाटे पाचच्या सुमारास धावण्यासाठी त्या बाहेर पडल्या. धावल्यानंतर आराम करण्यासाठी त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. मात्र, त्याचवेळी भरधाव वेगानं आलेल्या एका वाहनानं या तिघींना जोराची धडक दिली.

ही धडक एवढी जोरदार होती की यात इशिका आणि निशिका या दोघी बहिणांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची मैत्रिण सविता ही गंभीर जखमी झाली. सध्या पोलीस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Two sisters die in road accidents in Bhandara latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV