'नवसाचं पोर उडाणटप्पूचं निघतं', उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

‘हे सरकार म्हणजे नवसाचं पोर आहे. त्यामुळे नवसाचं पोर जर उडाणटप्पू निघालं तर बोलायचं कुणाला?’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

'नवसाचं पोर उडाणटप्पूचं निघतं', उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

कोल्हापूर : ‘हे सरकार म्हणजे नवसाचं पोर आहे. त्यामुळे नवसाचं पोर जर उडाणटप्पू निघालं तर बोलायचं कुणाला?’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

‘सरकारच्या धोरणामुळे जेरीस आलेल्या उद्योजकांनी आंदोलन छेडल्यास मी स्वतः त्याचं नेतृत्व करेल.’ असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं. आज (शनिवार) कोल्हापूर दौऱ्यावेळी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला.

सरकारनं शेतकरी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना देशोधडीला लावलेलं असलं तरी रामदेवबाबांसारखे नवे उद्योजकही पुढे येत आहेत. अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, याचवेळी उद्धव ठाकरेंनी सरकारच्या जाहिरातबाजीवरही हल्लाबोल केला. ‘मी खूप काही तरी करतोय असा आभास निर्माण करायचा आणि त्यावर जाहिराती करुन भोळ्याभाबड्या जनतेला फसवायचं आणि पुढे आपलं चालू ठेवायचं ही सरकारची व्याख्या माझी नाही. ही लोकशाही मानायला मी तयार नाही.’ असंही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Uddhav Thackeray criticized on BJP in Kolhapur latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV