...आता शेतकरी सरकारला रडवेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

सरकारने शेतकऱ्यांना रडवलं, आता शेतकरी सरकारला रडवेल, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर निशाणास साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी ही टीका केली.

...आता शेतकरी सरकारला रडवेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

सांगली : सरकारने शेतकऱ्यांना रडवलं, आता शेतकरी सरकारला रडवेल, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर निशाणास साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी ही टीका केली.

भाजप सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाला सळोकी पळो करुन सोडलं. पण आज तोच शेतकरी आज रडतो आहे. आता हाच शेतकरी रडवल्याशिवाय राहणार नाही."

राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल कोल्हापुरातील गावांचा दौरा केल्यावर आज ते सांगलीत आले होते.

आज सकाळीच त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेत सांगली दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी  वसंतदादांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटीलही उपस्थित होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Uddhav Thakreay
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV