समृद्धी महामार्गावरुन शिवसेनेची डबलढोलकी

एकीकडे राज्यभर दौरा करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची बाजू घेत असताना, त्यांच्याच मंत्री मात्र भूसंपादन कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत.

समृद्धी महामार्गावरुन शिवसेनेची डबलढोलकी

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरुन शिवसेनेची डबलढोलकी पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यभर दौरा करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची बाजू घेत असताना, त्यांच्याच मंत्री मात्र भूसंपादन कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत.

समृद्धी महामार्गासाठी होत असलेल्या विरोधानंतरही ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये आज जमीन अधिग्रहणासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन अधिग्रहणाचा शुभारंभ दोन दिवसांपूर्वीच नागपुरात करण्यात आला. तर आज शहापूरमधल्या जमीन अधिग्रहणाच्या कार्यक्रमालाही एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत.

एकीकडे उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची बाजू घेताना दिसत आहेत तर त्यांचे मंत्री मात्र अधिग्रहणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावरुन शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बातमी : समृद्धी महामार्ग मोजणीला हिंसक वळण

VIDEO:  स्पेशल रिपोर्ट: मुंबई- नागपूर हायवेचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट   

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV