70 वर्षांत पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार

6 जानेवारी 2018 रोजी मुंबई सेंट्रलमधल्या मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या 31 विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश वितरण सोहळा होणार आहे

70 वर्षांत पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार

मुंबई : 2018 हे वर्ष एसटी परिवहन मंडळासाठी परिवर्तनाचं वर्ष ठरणार आहे. सत्तर वर्षांत पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली.

6 जानेवारी 2018 रोजी मुंबई सेंट्रलमधल्या मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या 31 विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश वितरण सोहळा होणार आहे. यावेळी नाविन्यपूर्ण योजनांचं सादरीकरण कार्यक्रम होणार आहे.

गेल्या 70 वर्षात एसटीच्या गणवेशाबाबत कोणीच गांभीर्याने विचार केला नव्हता. एसटी महामंडळात सुमारे एक लाख कर्मचारी काम करतात. त्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिलं जायचं. ते कापड पसंत 'न' पडल्यामुळे कर्मचारी आपल्या सोयीने गणवेशाचे कापड खरेदी करुन गणवेश स्वतः शिवून घेत.

हे सर्व कर्मचारी एका रांगेत उभे राहिले, तर नेमका गणवेशाचा खाकी रंग कोणता? हे ओळखणे अवघड होत असे. साहजिकच एकाच पदावर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्याच्या गणवेशामध्ये रंगापासून शिलाईपर्यंत वैविध्य दिसून यायचं. अर्थात यातून गणवेशाची एकसंधता निघून जाते, असं रावते म्हणाले.

कसा असेल एसटी कर्मचाऱ्यांचा नवीन गणवेश?

महिला वाहकांसाठी साडी किंवा  पंजाबी ड्रेस ,कोट असा ड्रेस कोड आहे. या ड्रेसला रिफ्लेक्टरही लावण्यात आले आहेत. 

शिवाय अशाच प्रकारचे रिफ्लेक्टर मॅकेनिकच्या  ड्रेसला देखील रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत. जेणेकरुन, जर रात्रीच्या वेळी महामार्गावर बस नादुरुस्त झाली. तर अश्या वेळी एस टी जवळ उभ्या असलेल्या चालक, वाहकाच्या ड्रेसवरील रिफ्लेक्टरमुळे इतर वाहनचालकांना याबाबतची माहिती मिळेल.

रावते यांनी पहिल्यांदाच एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांना तयार गणवेश देण्याची संकल्पना मंडली. केवळ संकल्पना मांडून ते थांबले नाहीत, तर केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या 'राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजि संस्थान' (National Institute of Fashion technology 'NIFT') या संस्थेला एसटी कर्मचाऱ्यांचे नवीन गणवेश 'डिझाईन' तयार करण्यासाठी पाचारण केलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Uniform of ST Employees to be changed after 70 years latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV