कोल्हापुरात 'पद्मावती'चा सेट जाळला

Unknow men tries to set ablaze Rani Padmavatis’ set in Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापुरात दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचा सेट जाळण्याचा प्रयत्न झाला. मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेत अज्ञातांनी काही वाहनांवर दगडफेकही केली.

भन्साळींच्या समर्थनार्थ सुशांतने ‘राजपूत’ आडनाव हटवलं

राजस्थानमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करणी सेनेने  संजय लिला भन्साळी यांना मारहाण केली होती. तसंच शूटिंग करण्यास मनाई केली होती. सिनेमात राणी पद्मावती यांची प्रतिमा आणि इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करणी सेनेने केला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून कोल्हापूरच्या मसाई पठारावर ‘पद्मावती’ सिनेमाचं शूटिंग सुरु आहे.

जयपूरमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मारहाण

पण, या चित्रपटामागचं शुक्लकाष्ट थेट पन्हाळगडाच्या पायथ्याशीही कायम असल्याचं या घटनेवरुन समोर आलं आहे. दरम्यान, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

भन्साळी मुंबईला परतणार, ‘पद्मावती’चं शूटिंग रद्द

पद्मावती सिनेमात दीपिका पादूकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहेत. 17 नोव्हेंबर 2017 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिनेमात दीपिका राणी पद्मावती तर रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहेत.

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?

First Published:

Related Stories

सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी, राजू शेट्टींचा अल्टिमेटम
सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी, राजू शेट्टींचा अल्टिमेटम

पुणे : सदाभाऊ खोत यांच्याबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, बँका, कंपन्यांसह ब्रिटीश

चार कोटींच्या विम्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा बनाव
चार कोटींच्या विम्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा बनाव

नाशिक : नाशिकमध्ये अपघाती मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या चार

साताऱ्यातील मेढा गावात भिंत घरावर कोसळल्यानं 10 जण जखमी
साताऱ्यातील मेढा गावात भिंत घरावर कोसळल्यानं 10 जण जखमी

सातारा : जावळी तालुक्यातील मेढा गावातील एका खासगी व्यक्तीच्या

राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सेतू सुविधा केंद्रावर फेऱ्या
राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सेतू सुविधा...

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांकडे असलेल्या आधारकार्डावर खरंतर

शाळेच्या पटांगणात झाड कोसळलं, 20 विद्यार्थी जखमी
शाळेच्या पटांगणात झाड कोसळलं, 20 विद्यार्थी जखमी

रायगड:  शाळेच्या पटांगणात झाड कोसळल्यामुळे 20 विद्यार्थी जखमी झाले

अकोला मनपात राडा, नगरसेवकाने सभागृहात डुक्कर आणलं
अकोला मनपात राडा, नगरसेवकाने सभागृहात डुक्कर आणलं

अकोला: खडाजंगीसाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला महापालिकेत आज पुन्हा

उल्हासनगरमध्ये चिमुकला नदीत वाहून गेला!
उल्हासनगरमध्ये चिमुकला नदीत वाहून गेला!

उल्हासनगर : उल्हासनगरमधील वदोळ गावातला चिमुकला वालधुनी नदीत वाहून

पंढरपुरात वारकरी चिंतेत, ड्रेनेज फुटून चंद्रभागेचं वाळवंट दुषित
पंढरपुरात वारकरी चिंतेत, ड्रेनेज फुटून चंद्रभागेचं वाळवंट दुषित

पंढरपूर : विठूरायाच्या दारी भक्तांना घाणीच्या साम्राज्याला सामोरं

जिममध्ये व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू
जिममध्ये व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू

वसई : जिममध्ये व्यायाम करताना 30 वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे.