मालेगावमध्ये मतदार जागृतीसाठी वासुदेव आणि कव्वाली पार्टींचा आधार

Vasudev and Qawwali party base for voter awareness in Malegaon mnc election

मालेगाव : भिवंडी, पनवेल आणि मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे सर्वत्र पक्षाच्या उमेदवारांकडून प्रचाराचा जोर वाढला आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार मतदारांना घरोघरी जाऊन त्यांची भेट घेत आहेत. तर दुसरीकडे मालेगावमध्ये महापालिकेने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वासुदेव आणि कव्वली पार्टींचा आधार घेतला आहे.

मालेगाव महापालिकेची 24 मे रोजी निवडणूक होत असून, सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. मालेगाव महापालिकेसाठी एकूण 84 जागांसाठी एकूण 352 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून, सर्वच उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.

 

तर दुसरीकडे महापालिकेनेही मतदार जागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. मतदारांना जनजागृतीसाठी महापालिका आणि निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. याशिवाय घरोघरी जाऊन मतदारांना मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी वासुदेव आणि कव्वाली पार्टींचा आधार घेतला जात आहे.

मागील वेळेस मतदानाची कमी झालेली टक्केवारी लक्षात घेता, यंदा मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. महापालिकेने नेमलेले वासुदेव गल्लोगल्ली जाऊन मतदारांना मतदानाचे आवाहन करत आहेत. तर मुस्लीम बहुल भागातील मतदारांनी कव्वाली पार्टीच्या माध्यमातून मतदानास प्रोत्साहित करत आहेत.

दरम्यान,  शहराचे दिवसाचे तापमान42 अंश पेक्षा जास्त असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे उमेदवारांकडून सकाळी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळनंतर प्रचार रॅली काढण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, यंदा भाजपाने प्रथमच सर्व प्रभागातून मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मुस्लीमबहुल भागात कमळ फुलते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाचे मुस्लीम उमेदवारांनीही प्रचारात इतर पक्षांच्या उमेदवारांप्रमाणे आघाडी घेतली आहे.

 

महापालिकेच्या 84 जागांसाठी एकूण 352 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  • काँग्रेस- 73
  • राष्ट्रवादी काँग्रेस- 52
  • जनता दल- 10
  • भाजपा- 55
  • शिवसेना- 26
  • एमआयएम- 35
  • इतर व अपक्ष- 101  

संबंधित बातम्या

मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपकडून 45 मुस्लीम उमेदवारांना संधी

मालेगाव मनपा निवडणूक : कुठला उमेदवार श्रीमंत, कुणावर किती गुन्हे?

First Published:

Related Stories

कोल्हापूरमध्ये टोल कर्मचाऱ्यांची वाहन चालकाला मारहाण, चालक गंभीर
कोल्हापूरमध्ये टोल कर्मचाऱ्यांची वाहन चालकाला मारहाण, चालक गंभीर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाक्यावर ट्रक चालकाने

मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!
मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!

मालेगाव : अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाचा शो सुरु

10 दिवसांपासून पाऊस नाही, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
10 दिवसांपासून पाऊस नाही, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

नंदुरबार : पावसाने पाठ फिरवल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी

सदाभाऊ खोत यांची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी?
सदाभाऊ खोत यांची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी?

मुंबई : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या

संत निळोबारायांच्या पालखीत अण्णा हजारेही सहभागी
संत निळोबारायांच्या पालखीत अण्णा हजारेही सहभागी

इंदापूर : संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017

मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग, नागपूरमध्ये

धनदांडग्यांच्या कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचा लढा : पांडुरंग फुंडकर
धनदांडग्यांच्या कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचा लढा : पांडुरंग फुंडकर

बुलडाणा : गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता धनदांडग्या

365 दिवस चालणारी वाशिममधील जिल्हा परिषदेची शाळा 'हाऊसफुल्ल'
365 दिवस चालणारी वाशिममधील जिल्हा परिषदेची शाळा 'हाऊसफुल्ल'

वाशिम : राज्यात अनेक जिल्हा परिषद शाळांना पटसंख्याअभावी उतरती कळा

मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची हजेरी, नागपुरात मुसळधार
मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची हजेरी, नागपुरात मुसळधार

नागपूर/मुंबई : नागपुरात झालेल्या तुफान पावसाने रस्ते जलमय झालेले

मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली!
मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली!

मुंबई : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची