मंत्रिमंडळ विस्तारात शेलार आणि गावितांना लॉटरीचे संकेत

Vijaykumar gavit and Ashish Shelar likely to get ministry in cabinet expansion live update

मुंबई : येत्या आठवड्याभरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले नेते विजयकुमार गावित यांना संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विशेष म्हणजे विजयकुमार गावित हे राष्ट्रवादीचं सरकार असताना आदिवासी विकास मंत्री होते. त्यांनी मुलांच्या साहित्य खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप खुद्द भाजपच्या नेत्यांनीच केला होता. मात्र आरोपींना निवडणुकीत तिकीट देऊन पवित्र करण्याचा प्रकार कॅबिनेट विस्तारातही कायम राहण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या तोंडावर विजयकुमार गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मुलगी हीना गावितला नंदुरबारमधून लोकसभेवरही पाठवलं.

सत्तेसाठी पाचपुते, विजयकुमार गावितांना भाजपत प्रवेश, फडणवीसांचं लंगडं समर्थन

आम्हाला सत्तेवर येऊन बदल घडवायचा आहे. त्यामुळेच विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांना भाजपत प्रवेश दिला, असं लंगडं समर्थन, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 29 सप्टेंबर 2014 रोजी ‘माझा कट्टा’वर दिलं होतं.

विजयकुमार गावितांवर घोटाळ्याचे आरोप आम्ही केले नाहीत. पाचपुतेंवर आम्ही केले. मात्र आमचं सरकार आलं, तरी त्यांची चौकशी कायम राहिल. त्यामध्ये ते दोषी ठरले, तर त्यांच्यावर जरूर कारवाई होईल, असंही फडणवीस त्यावेळी म्हणाले होते.

यापूर्वी 8 जुलै 2016 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपच्या 7, शिवसेनेच्या 2 आणि मित्रपक्षांच्या 2 जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती.

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला गृहराज्यमंत्रीपद

बुलडाण्याचे पांडुरंग फुंडकर, शिंदखेडाचे जयकुमार रावल, निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर, सोलापूरचे सुभाष देशमुख आणि राम शिंदे यांनी गेल्यावेळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनाही कॅबिनट मंत्रिपद देत मुख्यमंत्र्यांनी सुखद धक्का दिला होता.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची स्वप्नपूर्ती करण्यात आली होती. जानकरांना पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्रालय देण्यात आलं.

याशिवाय शिवसेनेचे जालनाचे आमदार अर्जुन खोतकर आणि जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय यवतमाळमधील भाजपचे आमदार मदन येरावार आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनाही राज्यमंत्रिपद मिळाली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनीही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

शिवसेनेच्या अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. कॅबिनेटपदी प्रमोशन मिळालेल्या राम शिंदे यांनी जलसंधारण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.

मंत्रिमंडळ विस्तारात राम शिंदे यांची गृहराज्य मंत्रीपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली. यावेळी त्यांना पंकजा मुंडेंकडून काढून घेण्यात आलेलं जलसंधारण खातं देण्यात आलं.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Vijaykumar gavit and Ashish Shelar likely to get ministry in cabinet expansion live update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नारायण राणेंच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडल्याची चिन्हं
नारायण राणेंच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडल्याची चिन्हं

औरंगाबाद : काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप

थकीत पीक कर्जासह 31 जुलैपर्यंतच्या व्याजाचाही कर्जमाफीत समावेश
थकीत पीक कर्जासह 31 जुलैपर्यंतच्या व्याजाचाही कर्जमाफीत समावेश

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जास्तीत

परीक्षा रद्द करण्यासाठी शाळेला धमकीपत्र, सांगलीतील विद्यार्थ्यांचा प्रताप
परीक्षा रद्द करण्यासाठी शाळेला धमकीपत्र, सांगलीतील...

सांगली : परीक्षा रद्द करण्यासाठी सांगलीतील दोन विद्यार्थ्यांनी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/08/2017

ओबीसी क्रिमी लेअरची मर्यादा 6 लाखांहून 8 लाखांपर्यंत वाढवली, केंद्र

राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेले 10  निर्णय
राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेले 10  निर्णय

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

बीडमध्ये बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा, दाम्पत्याची हत्या
बीडमध्ये बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा, दाम्पत्याची हत्या

बीड : बीडमधील गेवराईत बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला.

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/08/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/08/2017*   शेकडो वर्षाची तिहेरी तलाक

राज्यातील 114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान
राज्यातील 114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान

मुंबई : विविध जिल्ह्यातील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि

ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले!
ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले!

मुंबई : दरवर्षी अनेक जण गणेशोत्सवादरम्यान जेव्हा कोकणात किंवा

मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?
मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी...

नवी दिल्ली : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित… 2008 च्या मालेगाव