'नोटाबंदीच्या निर्णयावेळी मोदींनी मंत्र्यांना खोलीत डांबलं होतं'

‘हुकूमशाही गाजवणाऱ्या नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर करताना नितीन गडकरी यांच्यासह अनेक मोठ्या मंत्र्यांना एका खोलीत डांबून ठेवले होते. त्यावेळी मग गडकरींनी विरोध का केला नाही?'

'नोटाबंदीच्या निर्णयावेळी मोदींनी मंत्र्यांना खोलीत डांबलं होतं'

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीन गडकरी यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांना एका खोलीत डांबून ठेवल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केला आहे.

नागपूरमध्ये नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसतर्फे आक्रोश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना विलास मुत्तेमवार यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

विलास मुत्तेमवार नेमकं काय म्हणाले?

‘हुकूमशाही गाजवणाऱ्या नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर करताना नितीन गडकरी यांच्यासह अनेक मोठ्या मंत्र्यांना एका खोलीत डांबून ठेवले होते. त्यावेळी मग गडकरींनी विरोध का केला नाही?, जेव्हा मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यावेळी मोदी गडकरींना ग्लासातून पाणी आणून द्यायचे.मग आता त्याच मोदींना गडकरी घाबरु लागले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयावेळी एका शब्दानं हे लोकं त्यांना काही बोलले नाही?’ असं मुत्तेमवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, या सभेत भाजपवर टीका करताना विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. भाजपवर टीकास्त्र सोडताना वडेट्टीवार यांनी शिवराळ भाषेचाही वापर केला.

VIDEO :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: vilas muttemwar criticized to Nitin Gadkari on Pm Modi’s demonetization decision
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV