व्हायरल सत्य : खरंच शेतकऱ्यांना 3 हजाराची पेन्शन मिळणार का?

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 13 April 2017 10:25 AM
व्हायरल सत्य : खरंच शेतकऱ्यांना 3 हजाराची पेन्शन मिळणार का?

प्रातिनिधिक फोटो

मुंबई: शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा राज्यासह देशभरात गाजत आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली.

त्यामुळे महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस सरकारवर शेतकरी कर्जमाफीसाठी दबाव वाढत आहे.

असं असताना सध्या महाराष्ट्रातील बहुतेक व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकरी पेन्शन योजनेबाबतचे मेसेज फिरत आहेत. इतकंच नाही तर राज्य सरकारच्या गॅझेटचा दाखला देत शेतकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याची विधेयकाची कॉपी फॉरवर्ड होत आहे.

या व्हायरल होणाऱ्या मेसेजची तपासणी एबीपी माझाने विविध पातळ्यांवर केली.

राज्य सरकारमधील मंत्री, अधिकारी, सचिवांसह राज्य सरकारच्या वेबसाईटवरुनही माहिती मिळवली.

काय आहे व्हायरल सत्य?

विधेयकाची जी कॉपी फॉरवर्ड होत आहे, ती राज्य सरकारच्या राजपत्रात प्रकाशित झाली आहे. या लिंकवर https://egazzete.mahaonline.gov.in/Forms/GazetteSearch.aspx  ती कॉपी उपलब्ध आहे.

काँग्रेस आमदार रामहरी रुपनवार यांनी हे खासगी विधेयक मांडण्यात आलं होतं. मात्र जोपर्यंत हे विधेयक सरकार स्वीकारत नाही, तोपर्यंत त्याला कायद्याचा दर्जा मिळत नाही.

Farmer loan waiver

खासगी विधेयक म्हणजे काय?

खासगी विधेयकं कोणीही आमदार मांडू शकतो. मात्र बहुतेक खासगी विधेयकांचा विचारच होत नाही. ती केवळ पटलावर सादर होतात.

जर एखादवेळी सरकारला असं कोणतं खासगी विधेयक पसंत पडलंच, तर संबंधित सदस्याला ते विधेयक माघारी घेण्यास सांगून, सरकारच्यावतीने स्वत: ते मांडलं जातं.

एबीपी माझाची पडताळणी

दरम्यान, जे विधेयक व्हॉट्सअपवर फिरतंय ते सत्य आहे मात्र ती अधिसूचना किंवा कायदा  नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार ही व्हॉट्सअप पोस्ट चुकीची असल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत सिद्ध झाली आहे.

आमदार रुपनवार यांची प्रतिक्रिया

राम हरी रुपनवार हे काँग्रेसचे सोलापूरमधील माळशिरसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांच्याशीही एबीपी माझाने संपर्क साधला. 

“नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक 6 एप्रिलला विधानपरिषदेत मांडलं. हे विधेयक खासगी आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी सरकारने त्याचा स्वीकार करुन, स्वत: सरकारने मांडावं”, अशी अपेक्षा राम हरी रुपनवार यांनी व्यक्त केली.

First Published: Thursday, 13 April 2017 10:25 AM

Related Stories

राज्यातील तूर खरेदी केंद्र बंदच, 24 तासानंतरही आदेश नाही
राज्यातील तूर खरेदी केंद्र बंदच, 24...

उस्मानाबाद : ज्या शेतकऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत नोंदणी केली आहे,

तूर खरेदीला आणि पैसे मिळायला दोन महिने उलटणार?
तूर खरेदीला आणि पैसे मिळायला दोन...

मुंबई : फक्त 22 एप्रिलपर्यंतच नोंदणी झालेल्या तूर खरेदीची सरकारने

''22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार''
''22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व...

मुंबई : आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर नोंदणी

सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करु, मुख्यमंत्र्यांचं शिवसेना मंत्र्यांना आश्वासन
सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करु,...

मुंबई : रांगेत उभे आहेत, तेवढ्या सगळ्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार

शेतकरी हवालदिल, लातुरात तूर जाळली!
शेतकरी हवालदिल, लातुरात तूर जाळली!

लातूर : तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

शेतकरी टू ग्राहक... ‘नाम’ची धान्य महोत्सवाची आयडिया!
शेतकरी टू ग्राहक... ‘नाम’ची धान्य...

ठाणे : तूर खरेदी होत नसल्याने एकीकडे राज्यातील शेतकरी हवालदिल

... तर स्वत: पणन मंत्र्यांच्या घरात तुरीची पोती टाकणार : बच्चू कडू
... तर स्वत: पणन मंत्र्यांच्या घरात...

मुंबई : नाफेडच्या केंद्रांवर 48 तासात तूर खरेदी सुरु न झाल्यास मी

22 एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रांवर आलेल्या तुरीचीच खरेदी : मुख्यमंत्री
22 एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रांवर...

नवी दिल्ली : नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्याची

कोणत्या जिल्ह्यात किती तूर शिल्लक, किती विक्री?
कोणत्या जिल्ह्यात किती तूर शिल्लक,...

मुंबई : नाफेडने तूर खरेदी बंद केल्यानंतर राज्यातील बाजार

सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय
सरकारकडून तूर विक्रीसाठी...

मुंबई : एकीकडे नाफेड आणि बाजार समित्यांनी तूर विक्रीची दारं बंद