पानसरे हत्या प्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर

पानसरे हत्या प्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडेला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील विरेंद्र तावडे हा मुख्य संशयित आरोपी आहे.

पानसरे हत्या प्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर

कोल्हापूर : पानसरे हत्या प्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडेला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.  कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील विरेंद्र तावडे हा मुख्य संशयित आरोपी आहे.

20 जानेवारीला तावडेच्या जामिन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद पूर्ण झाला होता. त्यावेळी विरेंद्र तावडेला जामिन देऊ नये असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. तर तावडे दोषी असल्यासंदर्भात कोणताच सबळ असा पुरावा नाही, त्यामुळं त्याला जामीन मिळावा अशी मागणी तावडेच्या वकिलांनी कोर्टाकडं केली.

त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश आणि कोल्हापूरला येण्यास मज्जावही करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: virendra tawade got bail in pansare murder case latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV