मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बस पलटली, 27 जण जखमी

खारेपाटणजवळील संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बस पलटली, 27 जण जखमी

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथे लक्झरी बसला अपघात झाला. या अपघातामध्ये 27 जण जखमी झाले आहेत. जखमींवर खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी कणकवलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

समोरून वेगात येणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बस चालकाला ट्रकला चुकवण्याचा योग्य अंदाज न आल्याने विशाल ट्रॅव्हल्सची बस रस्ता सोडून पंधरा फूट खोल जाऊन झाली पलटी झाली.

सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईहून बांद्याला ही बस जात होती.  खारेपाटणजवळील संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Vishal travels bus accident near Kharepatan on Mumbai Goa highway
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV