नांगरे-पाटील, अक्षय कुमारची शहीदांच्या कुटुंबीयांना दिवाळी भेट

ज्यांच्या घरातील वडील किंवा मुलगा शहीद झाले आहेत त्या 103 शहीदांची यादी तयार करुन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.

नांगरे-पाटील, अक्षय कुमारची शहीदांच्या कुटुंबीयांना दिवाळी भेट

कोल्हापूर : खरंतर पोलिस 24X7 व्यस्त असतात, दिवाळीच्या सणात तर चोख बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी त्यंच्या खांद्यावर असते. मात्र यातून वेळ काढून पोलिसांनी शहीदांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.

Police_Diwali_2

कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या कल्पनेतून ही दिवाळी साजरी करण्यात आली. ज्यांच्या घरातील वडील किंवा मुलगा शहीद झाले आहेत त्या 103 शहीदांची यादी तयार करुन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.

Police_Diwali_3

ही गोष्ट बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला समजल्यावर त्यानेही या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. शहीदांच्या कुटुंबीयांतील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांचा चेक आणि एक शुभेच्छा पत्र पाठवलं.

जेव्हा हे पोलिस या शहीदांच्या घरी पोहोचले तेव्हा कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

अक्षय कुमारचं पत्र

"आपल्या घरातील शूर शहीद वीराने देशासाठी दिलेलं बलिदान हे सर्वोच्च आहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपुत्राचा सार्थ अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की, या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सानिध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल.

आपल्यावर कोसळललें दु:ख हे अपार आणि कठोर आहे. मात्र यातून आपण सावरुन धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई आणि त्यांच्या पुस्तकांसाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, ही माझी नम्र विनंती."

अक्षय कुमार 

Akshay_Kumar

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV