भाजपला मतदान करा, शिवसेना आमदाराचं जाहीर आवाहन

शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेतील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश केला आहे. याची जाहीर माहिती त्यांनी व्यासपीठावरुन दिली.

Vote for BJP says Shivsena MLA pratap patil chikhlikar

नांदेड : राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप सत्तेत एकत्र आहे. एकत्र सत्तेत असूनही दोन्ही पक्षांची सतत एकमेकांवर कुरघोड्या सुरु असतात. पण शिवसेनेच्या विद्यमान आमदाराने जाहीर सभेत भाजपला मतदान करून विजयी करण्याचं आवाहन केलं आहे.

सध्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. त्यानिमित्ताने कामगारमंत्री संभाजी निलंगेकर हे नांदेडच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. या व्यासपीठावर शिवसेनेचे लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे देखील उपस्थित होते.

प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेतील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश केला आहे. याची जाहीर माहिती त्यांनी व्यासपीठावरुन दिली. शिवाय नांदेड महापालिकेत कोणत्याही परिस्थिती भाजपचाच महापौर झाला पाहिजे, असंही आवाहन त्यांनी केलं.

अशोक चव्हाणांवर टीका करताना निलंगेकरांची जीभ घसरली

सभेत भाजप मंत्र्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य हे नेहमीचंच झालं आहे का, असा प्रश्न निर्माण झाल आहे. दोन दिवसांपूर्वीच मंत्री बबनराव लोणीकर यांनी परभणीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता संभाजी निलंगेकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जाहीर भाषणात ‘रावण’ असा उल्लेख केला.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Vote for BJP says Shivsena MLA pratap patil chikhlikar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सीआयडी पोलीस निरीक्षकाची सांगलीत आत्महत्या
सीआयडी पोलीस निरीक्षकाची सांगलीत आत्महत्या

सांगली: पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?
अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?

धुळे/ मुंबई: तुटपुंज्या पगारावर राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी

पंढरपुरात दिवाळीनिमित्त विठ्ठल-रखुमाईला दागिन्यांचा साज
पंढरपुरात दिवाळीनिमित्त विठ्ठल-रखुमाईला दागिन्यांचा साज

पंढरपूर : दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात नरकचतुर्दशीला विठ्ठल

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर नाही, मग गुन्हे का?
एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर नाही, मग गुन्हे का?

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर नसल्याचं उच्च

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!
कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून

'..तर एसटी कर्मचाऱ्यांच्या जागी कंत्राटी कामगार भरु'
'..तर एसटी कर्मचाऱ्यांच्या जागी कंत्राटी कामगार भरु'

मुंबई: संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं अल्टिमेटम दिला

कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन, प्रशासनाचा इशारा
कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन, प्रशासनाचा इशारा

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप सुरु होऊन 24

अहमदनगर जिल्ह्यात फक्त 27 शेतकऱ्यांना कर्जमाफी
अहमदनगर जिल्ह्यात फक्त 27 शेतकऱ्यांना कर्जमाफी

अहमदनगर : कर्जाफीसाठी अर्ज केलेल्या अहमदनगरमधील केवळ 27 शेतकऱ्यांना

बीडमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या झेडपी सदस्यांचं पद रद्द
बीडमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या झेडपी...

बीड/मुंबई : झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी

एसटीचा दिवसभर 'थांबा', प्रवाशांचा खोळंबा!
एसटीचा दिवसभर 'थांबा', प्रवाशांचा खोळंबा!

मुंबई : अवघ्या महाराष्ट्रात सुरु असलेला दिवाळीच्या उत्साहावर एसटी