वाशिममधील ‘त्या’ शेतकऱ्याची आत्महत्या सावकारी तगाद्यातून?

मानोरा तालुक्यातल्या सोयजना गावातील रहिवासी ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सावकारी तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

वाशिममधील ‘त्या’ शेतकऱ्याची आत्महत्या सावकारी तगाद्यातून?

वाशिम : मानोरा तालुक्यातल्या सोयजना गावातील शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सावकारांच्या तगाद्यातून आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या मुलाने दाखल केली आहे. तसेच या प्रकरणी सरपंचासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यातील सोयजना येथील ज्ञानेश्वर मिसाळ यांनी 6 तारखेला यवतमाळमधील एका लॉजमध्ये आत्महत्या केली. मिसाळ यांनी 4 तारखेलाच चार ते पाच जणांना पोस्टाद्वारे पत्र पाठविलं होतं.

या पत्रात त्यांनी गावातील तीन लोकांकडून सतत सावकारी कर्जवसुलीसाठी तगादा सुरु असल्याचा उल्लेख होता. शुक्रवारी ते पत्र पोलिसांना मिळालं. यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर मिसाळ यांचा मुलगा सागरकडून पत्राची सत्यता पडताळली.

याद्वारे पोलिसांनी गावातील सरपंच विनोद चव्हाण, हरीअन्ना मिसाळ, आणि लक्ष्मन खोब्रागडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच दोन जणांना रात्री अटक केली, मात्र, एक जण फरार आहे.

दरम्यान, या अटक सत्रानंतर राजकीय आकसापोटी कारवाई केल्याची सुद्धा चर्चा रंगत  आहे. कारण ग्रामपंचायत निवडणुकीत ज्ञानेश्वर मिसाळ हे सदस्य पदासाठी उभे होते. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. तर दुसऱ्या गटातील सदस्य आणि सरपंच निवडून आले होते. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

बडोले, खोतांचं दुर्लक्ष, वाशिमच्या शेतकऱ्याची आत्महत्या

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: washim cotton farmer commits suicide
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV