मंत्र्यांना सांगूनही प्रश्न सुटला नाही, शेतकऱ्याची आत्महत्या

वाशिममधील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी 6 डिसेंबर रोजी यवतमाळ येथे आत्महत्या केली.

मंत्र्यांना सांगूनही प्रश्न सुटला नाही, शेतकऱ्याची आत्महत्या

वाशिम: मंत्र्यांना आपली करुण कहाणी सांगूनही प्रश्न न सुटल्यानं वाशिममध्ये एका शेतकऱ्यांनं आत्महत्या केली. ज्ञानेश्वर मिसाळ असं या 55 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे.

वाशिममधील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी 6 डिसेंबर रोजी यवतमाळला जाऊन तिथं विष प्राशन केलं.

ज्ञानेश्वर यांच्यावर बँकांचं कर्ज होतं, या प्रकरणी त्यांनी 27 नोव्हेंबरला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाज कल्याणमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिला होता. मात्र यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्यानं ज्ञानेश्वर यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

ज्ञानेश्वर यांच्यावर आयसीआयसी बँकेचं 3 लाखांचं, महिंद्रा फायनान्सचं अडीच लाखांचं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं दीड लाखांचं कर्ज होतं. हे कर्ज फेडता न आल्यानं त्यांनी आपलं आयुष्य संपवलं.

ज्ञानेश्वर मिसाळ यांनी आत्महत्या पूर्वी लिहिलेलं पत्र

विदर्भात जर कारखाने असते, तर गावातील 200 ते 250 कास्तकरांना पुणे-मुंबई पोट भरण्यासाठी जायची वेळ आली नसती. विदर्भ वेगळा झाला असता तर ही वेळ आली नसती. खरोखर आम्हाला मेट्रो नको आहे, आम्हाला जगण्याचा मार्ग पाहिजे.

शेतात तोटा झाला तरी बँकेचे व्यवहार नीट ठेवल्याने मी कर्ज मुक्तीमध्ये बसलो नाही. व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय हेच कळत नाही.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: washim farmer Dnyeshwer Misal suicide
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV