काकस्पर्श न झाल्याने नगरमध्ये बंधाऱ्यातून चक्क पाणी सोडलं!

खरंतर पाण्यावरचं शेवाळ काढणं अपेक्षित होतं किंवा शेवाळास कारणीभूत ठरणारं प्रदूषित पाणी रोखण्याची आवश्यकता असताना, चक्क पाणीच सोडण्यात आलं आहे.

काकस्पर्श न झाल्याने नगरमध्ये बंधाऱ्यातून चक्क पाणी सोडलं!

अहमदनगर : अहमदनगर श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्यानं बंधाऱ्यातील पाणी सोडण्याचा प्रकार घडला. शेवाळयुक्त पाणी साचल्याने काकस्पर्श होत नसल्याने गोरे मळ्याजवळील बंधाऱ्यातून लाख मोलाचं पाणी सोडण्यात आले. स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी हा अजब निर्णय घेतला.

खरंतर पाण्यावरचं शेवाळ काढणं अपेक्षित होतं किंवा शेवाळास कारणीभूत ठरणारं प्रदूषित पाणी रोखण्याची आवश्यकता असताना, चक्क पाणीच सोडण्यात आलं आहे. या अंधश्रद्धेने मात्र लाखमोलाचं पाणी वाया गेलं.

nagar water (2)

एकीकडे, सरकार पाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबवत असताना, दुसरीकडे काकस्पर्शासाठी बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने आश्चर्य तर व्यक्त केला जातोच आहे, मात्र संतापही व्यक्त होतो आहे.

पाणी सोडल्यानं काकस्पर्श होईल का यावरही उलट सुलट चर्चा सुरु आहे. श्रीगोंदा शहरातील सरस्वती नदीवर गोरे मळा परिसरात बंधारा  आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं बंधाऱ्याचं पाणी दशक्रियाच्या ओट्यापर्यत आलं होतं. मात्र या पाण्यावर शेवाळ साचल्याने दशक्रिया विधी करण्यास अडचण निर्माण होत असल्याचं काही नागरिकांचं मत होतं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Water thrown from dam in nagar latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: dam nagar water नगर पाणी बंधारा
First Published:
LiveTV