... तर घरगुती गॅसचे दर 200 रुपयांनी कमी होतील : गडकरी

गडकरींनी देशाच्या विकासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किती महत्वाचा आहे हे देखील सांगितलं.

... तर घरगुती गॅसचे दर 200 रुपयांनी कमी होतील : गडकरी

यवतमाळ : ''कोळशापासून मिथेनॉल आणि मिथेनॉलपासून DAP गॅस तयार होतो. आपण घरी जो गॅस वापरतो त्या LPG मध्ये अमेरिकेत 20 टक्के DAP वापरतात. आपणही अशा प्रकारे कोळशापासून DAP काढून वापरला तर गॅसची किंमत 200 ते 250 रुपयांनी कमी होऊ शकते,'' असं केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

नितीन गडकरी यांच्या हस्ते आज यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात वरोरा-वणी महामार्गाच्या 18.31 किमी चौपदरीकरणाचं आणि पिंपळखुटी रेल्वे ओव्हर ब्रिजचं भूमीपूजन पार पडलं. या कार्यक्रमात ते बोलत होते.

गडकरींनी देशाच्या विकासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किती महत्वाचा आहे हे सांगत, बायोवेस्टपासून जैविक गॅस तयार करण्याची गरज बोलून दाखवली. कोळशापासून मिथेनॉल आणि मिथेनॉलपासून तयार होणारा DAP गॅस घरघुती सिलेंडरमध्ये वापरण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातमीचा व्हिडीओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: we should use DAP in CNG which generate from Coal says nitin gadkari
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV