बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटरनॅशनल बोर्ड : शिक्षणमंत्री

शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कार्यक्रमातून येणाऱ्या काळात शिक्षकांची सुटका करण्याच्या दिशेने काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहे, अशी माहिती पंकजा मुंडेंनी दिली.

बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटरनॅशनल बोर्ड : शिक्षणमंत्री

सिंधुदुर्ग : एसएसएसी आणि सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटरनॅशनल बोर्ड निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 100 मराठी शाळांची निवड करण्यात येईल. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात घोषणा केली. सिंधुदुर्गात प्राथमिक शिक्षक समितीच्या 16 व्या अधिवेशनात ते बोलत होते.

अशैक्षणिक कामांतून सुटकेच्या दिशेने पावलं

शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कार्यक्रमातून येणाऱ्या काळात शिक्षकांची सुटका करण्याच्या दिशेने काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहे. त्याचसोबत, शिक्षकांना आता एमएस-सीआयटी पूर्ण करण्यासाठी मार्च 2018 च्या पुढे कालावधी वाढवून दिला जाणार नाही, अशी सूचना पंकजा मुंडे यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या 16 व्या अधिवेशनाची आज सांगता झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी या अधिवेशनाकडे पाठ फिरवली. राज्यभरातील हजारोंच्या संख्येने आलेल्या शिक्षकांनी या अधिवेशनाला हजेरी लावली.

या अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित होते. “शिक्षकांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून काम केले पाहिजे”, अशी अपेक्षा आपल्या भाषणात राणेंनी व्यक्त केली.

नारायण राणे यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा एकूण घेण्याची मानसिकता नसलेल्या एका शिक्षकाने भाषण सुरु असतानाच मध्येच उभे राहत, ‘चांगलं बोला’ अशी ओरड केली. नारायण राणे यांनी या शिक्षकालाही खडे बोल सुनावले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: We will formed international board for non English schools, Says Vinod Tawde
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV