राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?

What is the method of vote counting for president election latest update

नवी दिल्ली : जुलैमधे राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागायचा असेल तर त्यासंदर्भातील स्नेहभोजन आणि चर्चा फक्त ‘मातोश्री’वर होईल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या स्नेहभोजनाच्या चर्चा रंगलेल्या असताना संजय राऊत यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. पण मुळात राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया कशी होते, त्याचप्रमाणे त्याच्या मतांची आकडेवारी कशी असते, आणि शिवसेनेला या मतदान प्रक्रियेत किती स्थान आहे, याबाबत स्पेशल रिपोर्ट

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?

लोकसभेतले 543
राज्यसभेतले 233

असे एकूण 776 खासदार मतदान करतात

प्रत्येक खासदाराच्या एका मताची किंमत ही 708 आहे (देशातल्या सर्व आमदारांच्या मतांची एकत्र किंमत भागिले 776 असे करुन हा आकडा काढला जातो)

देशातल्या एकूण आमदारांची संख्या 4120

म्हणजे 776 खासदार अधिक 4120 आमदार  = 4896 जणांचं निर्वाचक मंडळ ( electoral college)

…………….

आमदारांच्या एका मताची किंमत ही प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते

उदा. महाराष्ट्र

महाराष्ट्राची 1971 मधली लोकसंख्या : 5,04,12,235

5,04,12,235 (पाच कोटी 4 लाख)
भागिले
288

याचं उत्तर येतं 1,75,042

( 288 नं भागण्याचं कारण विधानपरिषदेचे आमदार या निवडणुकीत मत देऊ शकत नाहीत)

एका आमदाराच्या मताची किंमत काढण्यासाठी या संख्येला एक हजारने भागा, उत्तर 175.042

त्याची पूर्णांक संख्या म्हणून 175  ही महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताची किंमत

यात 1971 हे लोकसंख्येसाठी आधारभूत वर्ष आहे

…………….

यूपीत एका आमदाराच्या मताची किंमत 208, तर गोव्यासारख्या छोट्या राज्यात ती 20 आहे
…………….

राष्ट्रपतींच्या निवडीसाठी एकूण मतांची किंमत 10,98,882

( यात 776 गुणिले 708 अधिक देशातल्या एकूण आमदारांच्या मताची किंमत 5,49,474)

…………….

बहुमतासाठी आकडा : 5,49,442
…………….

पाच राज्यांच्या निवडणुका होण्याआधी एनडीएकडे 4,74,336 मते होती

पाच राज्यातल्या यशानंतर हा आकडा 5,29,398 झाला असला, तरी अजूनही 20,044 ने कमीच आहे

शिवाय हा आकडा शिवसेनेला ग्राह्य धरूनचा आहे

शिवसेनेकडे 21 खासदार गुणिले 708 म्हणजे 14,868

अधिक

63 आमदार गुणिले 175 म्हणजे 11,025

अशी एकूण साधारण 25 हजार मतं आहेत

शिवसेना सोबत आली नाही तर एनडीएला कमी पडणाऱ्या मतांमध्ये 25 हजारांनी वाढ होऊन ती 45 हजारांवर पोहचतात

…………….

ही तूट भरून काढण्यासाठी एनडीएला बीजेडी किंवा एआयडीएमके यांची मदत घ्यावी लागेल. शिवाय काही अपक्ष आमदार, खासदारही कामी येतील

…………

बीजेडी सोबत आल्यास काय

बीजेडी कडे 20 लोकसभा अधिक सात राज्यसभा असे एकूण 27 खासदार

27 गुणिले 708 म्हणजे 19,116 इतकी खासदारांची मतं

तर 117 आमदार आहेत

एका आमदाराच्या मताची किंमत ओडिशात 149 आहे

117 गुणिले 149 म्हणजे 17,433 इतकी आमदारांची मतं आहेत.

दोन्हींची बेरीज केली, तर बीजेडी सोबत आल्यास 36 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकते

……………

एआयडीएमके सोबत आल्यास काय?

एआयडीएमकेकडे लोकसभेत 37 तर राज्यसभेत 13 असे एकूण 50 खासदार आहेत

म्हणजे 50 गुणिले 708 म्हणजे 35 हजार 400 इतकी खासदारांची मतं आहेत

तर एआयडीएमकेकडे 134 आमदार आहेत

तामिळनाडूत एका आमदाराच्या मताची किंमत 176 आहे

134 गुणिले 176 म्हणजे 23,584 इतकी आमदारांची मतं आहेत

दोन्हींची बेरीज केली तर एआयडीएमके सोबत आल्यास साधारण 58 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकेल.

एनडीएला अजूनही मतं कमी असल्यानं शिवसेनेचा भाव टिकून आहे

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:What is the method of vote counting for president election latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

रेल्वेचा किळसवाणा कारभार, पूर्वा एक्सप्रेसमध्ये जेवणात पाल!
रेल्वेचा किळसवाणा कारभार, पूर्वा एक्सप्रेसमध्ये जेवणात पाल!

नवी दिल्ली : हावडाहून दिल्लीला निघालेल्या पूर्वा एक्सप्रेसमध्ये

मृत्यू कमी करण्यासाठी रुग्णालयातच महामृत्यूंजय यज्ञ
मृत्यू कमी करण्यासाठी रुग्णालयातच महामृत्यूंजय यज्ञ

हैदराबाद : रुग्णालयातील मृतांचा आकडा कमी करण्यासाठी चक्क

2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद नाही, सूत्रांची माहिती
2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद नाही, सूत्रांची माहिती

नवी दिल्ली : रिझर्व बँकेनं 5 महिन्यापूर्वीच दोन हजार रुपयांच्या

24 आयएएस अधिकाऱ्यांसह 381 सरकारी बाबूंवर कारवाई
24 आयएएस अधिकाऱ्यांसह 381 सरकारी बाबूंवर कारवाई

नवी दिल्ली : 24 आयएएस अधिकाऱ्यांसह नागरी सेवेतील 381 सरकारी बाबूंवर

रिझर्व बँकेकडून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद
रिझर्व बँकेकडून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद

नवी दिल्ली : आगामी काळात 2000 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवण्याची

चिंता करु नका, भारताकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा : संरक्षणमंत्री
चिंता करु नका, भारताकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा : संरक्षणमंत्री

नवी दिल्ली : भारतीय लष्कराकडे सध्या उपलब्ध असलेल्या

गोव्यातील विमानतळावरुन सोन्याच्या पट्ट्या आणि बिस्किटं जप्त
गोव्यातील विमानतळावरुन सोन्याच्या पट्ट्या आणि बिस्किटं जप्त

पणजी (गोवा) : गोव्यातील दाबोळी विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या

गोव्याच्या राजकारणात विजय सरदेसाईंचा मास्टरस्ट्रोक
गोव्याच्या राजकारणात विजय सरदेसाईंचा मास्टरस्ट्रोक

पणजी (गोवा) : काँग्रेसच्या बाबुश मोन्सेरात यांना गोवा फॉरवर्ड

शाळा-कॉलेजमध्ये 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत सक्तीचं : मद्रास हायकोर्ट
शाळा-कॉलेजमध्ये 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत सक्तीचं : मद्रास...

चेन्नई : तामिळनाडूत प्रत्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि शैक्षणिक

भाकड गायींच्या देखभालीसाठी गोवा सरकार आर्थिक मदत देणार!
भाकड गायींच्या देखभालीसाठी गोवा सरकार आर्थिक मदत देणार!

पणजी : गोव्यातील भाकड गाय आणि वृद्ध बैलांच्या देखभालीचा खर्च परवडत