कीटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी?

शेतकऱ्यांना झालेल्या विषबाधे मागे कीटकनाशक फवारतानाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे यावर शेतकऱ्यांनी काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे.

What kind of care should we take during spraying pesticides?

प्रातिनिधिक फोटो

यवतमाळ : शेतकऱ्यांना झालेल्या विषबाधे मागे कीटकनाशक फवारतानाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे यावर शेतकऱ्यांनी काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे.

कीटकनाशकांची खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?

 • कीटकनाशक फवारताना सगळ्यात आधी त्यावर लिहीलेल्या गुणधर्मांची माहिती घेणं गरजेचं आहे.
 • तसेच, त्यावर काही चिन्हं दिलेली असतात, ज्यावरुन त्याच्या जहालपणाचं प्रमाण मिळतं. यामध्ये हिरवा रंग कमी विषारी, निळा मध्यम विषारी, पिवळा तीव्र विषारी आणि लाल अति विषारीसाठी वापरला जातो.
 • सोबतच त्या कीटकनाशकाचा उत्पादन दिनांक आणि वापरण्याचा कालावधी पाहून घ्यावा. कालावधी संपलेले कीटकनाशक वापरु नये.

कीटकनाशकाचं मिश्रण तयार करताना कोणती काळजी घ्यावी?

 • कृषी विभागानं शिफारस केलेल्या प्रमाणातच रसायनं घ्यावी.
 • रसायनांच्या भुकटीला सुरुवातीला थोड्या पाण्यात मिसळावं.
 • त्यानंतर गरजेनुसार त्यात पाणी टाकावं.

कीटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी?

 • मिश्रण तयार करताना हातमोजे घालणे आणि तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.
 • सोबतच फवारणी करतांना अंग झाकलेलं असणं गरजेचं असतं. यामध्ये हात आणि पायात मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर कापड आणि अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे.
 • फवारणी करताना पंपाचे नोझल शरिरापासून दूर धरावे. जेणेकरुन कीटकनाशक अंगावर पडणार नाही. कारण, विषबाधा झालेल्या बहुतांशी शेतकऱ्यांमध्ये हिच तक्रार दिसून आली आहे.
 • तसेच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये.
 • पाऊस येण्याआधी किंवा पाऊस झाल्यानंतर फवारणी करु नये.
 • फवारणी झाल्यानंतर काही काळ शेतात जाणं टाळावं.
 • फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा वस्तू इतर कामांसाठी वापरु नये. विषबाधेचे लक्षणं दिसून आल्यास त्वरीत काही प्राथमिक उपाय करावे.

कीटकनाशक फवारणी यंत्राबाबत कोणती काळजी घ्यावी?

 • कीटकनाशक फवारतांना योग्य नोझलची निवड करणंही गरजेचं असतं.
 • बुरशीनाशकाची फवारणी केलेल्या नोझलचा किटकनाशकासाठी वापर करु नये.
 • नोझल गळका असल्यास त्याचा वापर टाळावा.

आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात एकूण 560 शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. यामध्ये दृष्टीदोष झालेले 25 शेतकरी आहेत. हे थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरुक राहणं गरजेचं आहे. फवारणी बाबतच्या अशा काही प्राथमिक बाबींची काळजी घेतल्यास विषबाधेचा धोका टाळता येऊ शकतो.

संबंधित बातम्या

फवारणी करताना विषबाधा, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत!

फवारणी करताना विदर्भात 18 जणांचा मृत्यू, तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:What kind of care should we take during spraying pesticides?
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!
कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून

अनुसूचित जातींचा निधी सरकार कर्जमाफीसाठी वापरणार
अनुसूचित जातींचा निधी सरकार कर्जमाफीसाठी वापरणार

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी अनुसूचित जाती उपयोजनेचा निधी मंजूर

गोधनातून वर्षाला 36 लाखांची कमाई, माझाचा स्पेशल रिपोर्ट
गोधनातून वर्षाला 36 लाखांची कमाई, माझाचा स्पेशल रिपोर्ट

नाशिक : आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींकडे न पाहता

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/10/2017

  शिवसेनेचं नीच राजकारण, उद्धवची खेळी कधीच विसरणार नाही, राज

फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर
फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन 30

पुणतांब्यात नव्या क्रांतीची तयारी, शेतकरी गावरान वाणाची पेरणी करणार
पुणतांब्यात नव्या क्रांतीची तयारी, शेतकरी गावरान वाणाची पेरणी...

पुणतांबा (अहमदनगर) : शेतकरी संपाची मशाल पेटवणाऱ्या पुणतांब्यातून

मुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे : बाळा नांदगावकर
मुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे : बाळा नांदगावकर

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूस सरकारी यंत्रणा

मनसेचा आक्रमक पवित्रा, शेतकरी मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये तोडफोड
मनसेचा आक्रमक पवित्रा, शेतकरी मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये तोडफोड

यवतमाळ: कीटकनाशकं फवारणी अनेक शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्यानंतर,

अकोल्यात 14 कोटींचा अवैध कीटकनाशक साठा जप्त
अकोल्यात 14 कोटींचा अवैध कीटकनाशक साठा जप्त

अकोला : कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू

दुष्काळी भागात ‘तेजोमय’ शेती, पॉलीहाऊसच्या हायटेक शेतीतून लाखोंचा नफा
दुष्काळी भागात ‘तेजोमय’ शेती, पॉलीहाऊसच्या हायटेक शेतीतून लाखोंचा...

सांगली : दुष्काळग्रस्त भागात जिथे साधी शेती करणंही अवघड असतं, तिथे