एबीपी माझाचं व्हाट्सअॅप बुलेटीन 03/12/2017

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

By: | Last Updated: 03 Dec 2017 06:42 PM
एबीपी माझाचं व्हाट्सअॅप बुलेटीन 03/12/2017

एबीपी माझाचं व्हाट्सअॅप बुलेटीन 03/12/2017

 1. पोस्टर हटवण्यावरुन गुजरातमधील राजकोट शहरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांनी मारहाण केल्याचा खासदार राजीव सातव यांचा आरोप, हिंगोलीत भाजप कार्यालयाची तोडफोड https://goo.gl/UD5a3Y


 

 1. अशोक चव्हाण चांगले नेते, पण अधून-मधून घोटाळेही करतात, सांगलीतील कार्यक्रमात पतंगराव कदमांची चव्हाणांना कोपरखळी https://goo.gl/mMWK2T


 

 1. प्रवीण महाजनांविरोधात साक्ष दिल्याच्या रागामुळेच गोपीनाथ मुंडेंवर बेछूट आरोप, सारंगी महाजनांच्या सनसनाटी आरोपानंतर प्रकाश महाजनांचा दावा https://goo.gl/SbaZ4w


 

 1. 30 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणारं सरकार म्हणजे मेक इन महाराष्ट्र नाही तर फूल इन महाराष्ट्र, मुख्यमंत्र्यांवर भाजपच्याच ट्विटर हँडलवरून निशाणा https://goo.gl/5eSauC


 

 1. ओखी चक्रीवादळ मुंबई, कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता, किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, दक्षिण भारतातल्या बोटी भरकटल्या https://goo.gl/xghgrk


 

 1. उत्तर प्रदेशात जे झालं, त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरातमधील प्रचारसभेत दावा https://goo.gl/NrjNUh


 

 1. आयपीएल सट्ट्यात हरलेले दीड कोटी फेडण्यासाठी घरफोड्या, औरंगाबादमध्ये खिडकी गँग जेरबंद https://goo.gl/TtMbBM


 

 1. 2016 मध्ये देशात तब्बल 1 लाख 51 हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू, 80 टक्के रस्ते अपघात चालकांच्या चुकीमुळे, एनसीआरबीचा अहवाल https://goo.gl/aYMNq6


 

 1. ना काश्मिरातील गोळीबारात, ना युद्धात, रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी सर्वाधिक जवानांचा मृत्यू https://goo.gl/QZD7Xk


 

 1. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद 2018 मध्ये पाकिस्तानात निवडणूक लढणार, हाफिजकडून मिल्ली मुस्लीम लीग नावाच्या पक्षाचीही स्थापना https://goo.gl/FDKKCS


 

 1. जागतिक अपंग दिनी शाहिर विजयराव तानपुरेंची शिर्डीत गगनभरारी, शरीरानं अपंग असलात तरी मनानं अपंग राहू नका, तानपुरेंचा अपंगांना सल्ला http://abpmajha.abplive.in/


 

 1. अक्षय कुमार-रजनीकांतच्या 2.0 ची रिलीज डेट अखेर जाहीर, 27 एप्रिल 2018 रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला https://goo.gl/UPuLR6


 

 1. व्हॉट्सअॅपचं आणखी एक नवं फीचर, ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते आता अॅडमिनच ठरवणार https://goo.gl/W4VXvr


 

 1. विराट कोहलीच्या विक्रमी द्विशतकानं टीम इंडियाचा डाव सात बाद 536 धावांवर घोषित; दिवसअखेर श्रीलंकेच्या तीन बाद 131 धावा, दिल्ली कसोटी वाचवण्यासाठी श्रीलंकेवर संघर्षाची वेळ https://goo.gl/U1sncz


 

 1. दिल्ली कसोटीत खेळ थांबवण्यासाठी श्रीलंकेची प्रदूषित हवेची वारंवार तक्रार; टीम इंडियाने पहिला डाव घोषित केल्याने पेचप्रसंग टळला https://goo.gl/xiDSnE


 

एबीपी माझाची #ब्लॉगमाझा स्पर्धा 2017, तुमच्या प्रवेशिका पाठवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा  https://goo.gl/L8AjKc

BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांच्या 'एका हरवलेल्या दशकाची डायरी' सदरातील नवा ब्लॉग : जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या https://goo.gl/prB3Et

माझा कट्टा : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: whatsapp bulletin for 03 December 2017 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV