देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

“नागपूरच नाही, तर नागपूरच्या बाजूलाही चालेल. एका नव्या पद्धतीने पूर्ण सृष्टी बनवावी लागले.”, असेही ते यावेळी म्हणाले.

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रदूषणामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा, अशी इच्छा आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली. ते नागपुरात ‘अंतरंग वार्ता’ या  अनुयायांच्या बैठकीत बोलत होते.

श्री श्री रविशंकर नेमके काय म्हणाले?

“नागपूरला का राजधानी बनवलं जाऊ नये? नागपूर देशाच्या बरोबर मध्यभागी आहे. सर्वांना येण्या-जाण्याला बरं पडेल. आधीही विचार झाला होता. आता तर आपले पंतप्रधान डायनॅमिक आहेत. ते करु शकतात.”, असे श्री श्री रविशंकर म्हणाले.

त्याचसोबत, “नागपूरच नाही, तर नागपूरच्या बाजूलाही चालेल. एका नव्या पद्धतीने पूर्ण सृष्टी बनवावी लागेल.”, असेही ते यावेळी म्हणाले.

श्री श्री रविशंकर यांच्या वक्तव्यानंतर अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र श्री श्री रविशंकर यांना राजकीय नेत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Why not nagpur is capital?, says Shri Shri ravishankar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV