वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?

अटींचा भंग केल्याने वसगडे ग्रामपंचायतीने शूटिंग बंद करण्याची नोटीस प्रॉडक्शन हाऊसला दिली आहे.

why villagers from vasagade, kolhapur oppose tuzyat jiv rangalas shooting

कोल्हापूर: ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेच्या शूटिंगला कोल्हापूरजवळच्या वसगडे या गावातील नागरिकांनी विरोध केला आहे.

अटींचा भंग केल्याने वसगडे ग्रामपंचायतीने शूटिंग बंद करण्याची नोटीस प्रॉडक्शन हाऊसला दिली आहे. यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील 150 हून अधिक कलाकार,सहकलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या रोजी- रोटीचा प्रश्न निर्माण झालं आहे. तर प्रॉडक्शन हाऊस आणि ग्रामस्थ यांच्यात तोडगा निघावा म्हणून चित्रपट महामंडळाने पुढकार घेतला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या  मालिकेचं  शूटिंग गेल्या दीड वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यतल्या वसगडे गावात सुरु आहे. या मालिकेतील राणादा आणि  पाठक बाई यांची जोडी खूपच लोकप्रिया आहे.

या जोडीला महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे त्यांचे फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. नेमका त्याचाच त्रास गावकऱ्यांना होत आहे.

“शूटिंग मुळे गावाची सामाजिक शांती भंग होत आहे. शिवाय क्रू मेंबर, कलाकार आणि संबंधित व्यक्ती गावात दारु पिऊन, मटण खाऊन चौकात घाण करतात. इतकंच नाही तर शूटिंग रात्रभर सुरु असतं, त्यामुळे जनरेटरच्या आवाजाने झोप लागत नाही. शिवाय मुलांच्या अभ्यासावरदेखील परिणाम होत आहे. तसंच शूटिंग पाहायला येणाऱ्या व्यक्तींच्या पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे”, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे.

शूटिंग सुरु होण्यापूर्वी ग्रामपंच्यातीने दिलेल्या परवानगीत अनेक नियम अटी घातल्या आहेत. पण या अटींचा भंग केल्याचा आरोप करत, ग्रामस्थांनी थेट ग्राम पंचायतीवर मोर्चा काढला.

यावेळी महिलांनी केलेल्या मागणीवरुन, वसगडे ग्रामपंचायतीने तात्काळ प्रोडक्शन हाऊसला नोटीस पाठवून शूटिंग थांबवण्याचे आदेश दिले.

ग्रामपंचायतीच्या शूटिंग बंदीच्या नोटीसनंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुढाकार घेत सरपंचांची भेट घेतली. मालिकेला शूटिंग सुरु करण्याची परवागनी द्यावी अशी मागणी चित्रपट महामंडळाने ग्रामपंचायतीकडं केली. तसंच कोल्हापूर आणि परिसरातील दीडशेहून अधिक कलाकार, तंत्रज्ञांच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून गावात शूटिंग सुरु असताना, आताच विरोध का झाला? गावातील राजकीय वादातून हा विरोध होत आहे का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

संबंधित बातम्या

‘तुझ्यात जीव रंगला’चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी 

पॅकअप झाल्यावर ‘ती’ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही! 

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय! 

इंटरनेटवरील पाठकबाईंबद्दलची ही माहिती चुकीची! 

फोटो : राणा दा आणि पाठक बाईंच्या लग्नाचा अल्बम

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:why villagers from vasagade, kolhapur oppose tuzyat jiv rangalas shooting
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातही कोयताच, शिक्षणाचं काय?
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या...

पुणे : एकही मुल शाळाबाह्य राहू नये म्हणून 2009 मध्ये बालकांचा मोफत आणि

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/11/2017*   भुवी-शमीसमोर श्रीलंका

अमोल यादवांच्या सहाआसनी स्वदेशी विमानाचं अखेर रजिस्ट्रेशन
अमोल यादवांच्या सहाआसनी स्वदेशी...

मुंबई : अमोल यादव यांचं स्वदेशी बनावटीचं विमान झेपावण्याचा मार्ग

अंडं महाग की कोंबडी?
अंडं महाग की कोंबडी?

पुणे : ‘अंडं आधी की कोंबडी आधी?’ असं गमतीनं विचारलं जातं. परंतु आता

औरंगाबादेत शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये व्हॉट्सअॅपवरुन कॉपी
औरंगाबादेत शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये...

औरंगाबाद : औरंगाबादच्या शरदचंद्र पवार पॉलिटेक्निकमध्ये कॉप्यांचा

वेण्णा लेकला गळती, भगदाड बुजवण्यासाठी दोन ट्रक जुने कपडे
वेण्णा लेकला गळती, भगदाड...

सातारा: साताऱ्यातील वेण्णालेक धरणाला भलमोठं भगदाड पडलं आहे. ही गळती

लिंग बदलानंतर पुन्हा पोलिसात रुजू होण्यास 'तिला' परवानगी नाही
लिंग बदलानंतर पुन्हा पोलिसात रुजू...

बीड : बीडमध्ये लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर पुन्हा पोलिस सेवेत रुजू

ऐन हिवाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी
ऐन हिवाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी...

मुंबई : ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी

चंपाषष्ठीनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी
चंपाषष्ठीनिमित्त जेजुरी गडावर...

पुणे : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर ‘चंपाषष्ठी

मराठवाड्यातही ऊस दर आंदोलन पेटण्याची शक्यता, शेतकरी आक्रमक
मराठवाड्यातही ऊस दर आंदोलन...

लातूर : ऊस दर आंदोलन आता मराठवाड्यातही पेटण्याची शक्यता आहे. लातूर