उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करुन दारु तस्कराला पळवलं!

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करुन दारु तस्कराला पळवलं!

उस्मानाबाद : दारु तस्करांची गुंडगिरी उस्मानाबादमध्ये समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेल्या दारु तस्कराला सोडवण्यासाठी काही गुंडांनी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना मारहाण करत खुनी हल्ला केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यालयात हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली. आरोपींनी अधिकाऱ्यांना मारहाण करून त्यांनी दारु तस्कराला पळवून नेले.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणारा रिपाई पक्षाच्या युवक विभागाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असून पोलिसात त्याच्यासह अन्य आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उस्मानाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 20 एप्रिल रोजी सायंकाळी कळंब येथील कुसळंब माजलगाव रोड वर गोवा बनावटीची दार घेऊन जाताना एक टेम्पो पाठलाग करून पकडला. पोलिसांना या टेम्पोत तब्बल 9 लाख रुपयांची अवैध तस्करी होत असलेली दारु सापडली. यात मॅकडॉनल कंपनीचे वेगवेगळे ब्रँड असलेली 109 बॉक्स दारु होती.

यानंतर अधिकाऱ्यांनी दारु असलेला ट्रक व आरोपी तस्कर मोतीराम भोसलेला उस्मानाबाद येथील कार्यालयात आणले व त्याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 9 लाखांची दारु जप्त करून कायदेशीर कारवाई सुरु केली.

त्यावेळी रोहन उर्फ मुन्ना खुणे हा 7 ते 8 जणांना घेऊन कार्यालयात आला व पकडलेली दारु व तस्कर भोसले याला सोडण्यास सांगितले.

अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर खुणे याने लोखंडी रॉडने कार्यालयातील अधिकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व कागदपत्रे फाडून टाकली.

खुणे याने मारहाण केल्यानंतर दारु तस्कर भोसले याला कार्यालयातून पळवून नेले. दारु तस्कर भोसले आहे, जो कार्यालयातून पळून गेला असून याला सोडवण्यासाठी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संतोष जगदाळे व उप निरीक्षक राजकुमार राठोड या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात हे दोघे जखमी झाले आहेत.

आरोपी खुणे याने राज्य उत्पादन शुलक विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन वर धमकी देत शिवीगाळ केली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: attack excise dept Wine Smuggler
First Published:
LiveTV