पाऊस आला म्हणून झाडाखाली थांबले, वीज पडून चौघांचा मृत्यू

पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत चार जण जखमीही झाले आहेत. महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारातील ही घटना आहे.

पाऊस आला म्हणून झाडाखाली थांबले, वीज पडून चौघांचा मृत्यू

यवतमाळ : अवकाळी पावसाने यवतमाळमध्ये चौघांचा जीव घेतला आहे. पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत चार जण जखमीही झाले आहेत. महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारातील ही घटना आहे.

मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील लातूरसह काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. तर विदर्भातही अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.

यवतमाळ जिल्ह्यातील या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं प्रभाकर जाधव, पंडित हरणे, अनिल सरगुळे आणि लक्ष्मण चोपडे अशी आहेत. तर जितेंद्र सुरदूसे, विशाल सुरकळे आणि कैलास  सुरो यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातही विविध ठिकाणी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Yavatmal rain four died in Lightning collapsed on tree
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: rain Thunder yavatmal पाऊस यवतमाळ वीज
First Published:

Related Stories

LiveTV