यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर छपा, 23 जणांना अटक

यवतमाळमध्ये सुरु असलेल्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांनी छापा टाकून तब्बल 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आली आहे.

यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर छपा, 23 जणांना अटक

यवतमाळ : यवतमाळमध्ये सुरु असलेल्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांनी छापा टाकून तब्बल 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील सुर्दापूर येथील आंतरराज्यीय जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या पथकाने छापा टाकला.

या छापेमारीत  2 लाख 54 हजारची रोकड, 23 मोबाईल, 12 वाहने आणि जुगार साहित्य असा एकूण 55 लाख 49 हजार 230 रु मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच, या प्रकरणी तेलंगणा-आंध्र प्रदेशातील रंगारेड्ड, करीमनगर, आदिलाबाद, हैदराबाद, जगतीयार या जिल्ह्यातील तब्बल  23 जणांना अटक केली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: yawatmal police raid on illegal gambling center
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV